सांगोला विद्यामंदिर ज्यु.कॉलेजच्या योगीराज बनकरचे जेईई परीक्षेत सुयश; जानेवारी २०२३जेईई मेन परीक्षेमध्ये मिळविले ९८.२१पर्सेंटाईल

सांगोला (प्रतिनिधी):- नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या जानेवारी २०२३ मधील जेईई मेन परीक्षेत सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी कुमार योगीराज राजाराम बनकर ( इ.१२ शास्त्र) याने ९८.२१ पर्सेंटाइल मिळवून सुयश प्राप्त केले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्याला सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज मधील शास्त्र शाखेच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.
या यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म.शं.घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके,सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार,बिभीषण माने व सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या..



