सांगोला तालुकाशैक्षणिक

सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुका सोसायटी विकास आघाडीचा झेंडा; १३-० ने केला गुरुसेवा पॅनलचा दारुण पराभव

सुमारे ८०० सभासद असणाऱ्या सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्था अर्थात तालुका सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तालुका सोसायटी विकास आघाडी सांगोलाचे सर्वच्या सर्व तेरा उमेदवार १०० ते १२५ मतांच्या फरकाने निवडून आले असून गुरुसेवा  पॅनलचा  धुव्वा उडाला आहे. काल सांगोला येथे जि.प. शाळा पुजारवाडी येथे निवडणूक होऊन लगेचच मतमोजणी झाली.त्यामध्ये तालुका सोसायटी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना ४२०  ते ५०९ मते प्राप्त झाली असून गुरुसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना ३२० पर्यंतच मजल मारता आली त्यामुळे सर्वच्या सर्व तेरा जागांवर दणदणीत विजय मिळाला असून यामुळे शिक्षकांमध्ये एक नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे. वर्षांची परंपरा असलेल्या तालुका सोसायटीला निवडणुकीने आता नवे कारभारी मिळणार आहेत. सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक समिती, सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक संघ थोरात गट व जुनी पेन्शनच्या पाठिंबावर उभा राहिलेले तालुका सोसायटी विकास आघाडी पॅनल ने दणदणीत यश मिळवून पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना मोठी चपराक दिलेली आहे. निवडणुकीमध्ये सर्वसाधारण गटातून भागवत भाटेकर, संजय काशीद पाटील, बाबासाहेब इंगोले, सतीश सपताळ, हमजू मुलाणी, बाळासाहेब बनसोडे, विजयकुमार इंगवले, संतोष कांबळे हेनिवडून आले आहेत तर महिला प्रवर्गातून नयना पाटील व सावित्रा कस्तुरे, इतर मागास प्रवर्गातून मुरलीधर गोडसे, अनुसूचित जातीमधून राहुल चंदनशिवे तर भटक्या जाती जमातीतून सुहास वलेकर यांची निवड झालेली आहे. निकाल जाहीर होताच गुलालाची मुक्तहस्ते उधळण करून सांगोला शहरांमध्ये मिरवणुकीने सर्व महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले .
स्वर्गीय मा.आ.गणपतराव देशमुख यांचे निवासस्थान व मा.आ.दीपक आबा साळुंखे पाटील यांचे कार्यालयामध्ये सर्व उमेदवारांचे सत्कार करण्यात आला. मिरवणुकीची सांगता तालुका सोसायटीच्या कार्यालयात करण्यात आली. याप्रसंगी मा.आ.दीपक आबासाळुंखे पाटील व बाबासाहेब देशमुख यांनी नवनियुक्त संचालकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. डॉ.पियुष दादा साळुंखे पाटील यांनीही सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. निवडणुकीमध्ये यश प्राप्त करण्यासाठी शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र नवले,जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी, ज्येष्ठ नेते पतंगराव बाबर,एकनाथ जावीर तालुकाध्यक्ष भारत लवटे यांनी तर शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सुहास कुलकर्णी,जिल्हा सोसायटी संचालक गुलाबराव पाटील, तालुका सरचिटणीस विलास डोंगरे सह दीपकआबा साळुंखे पाटील प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेचे सर्व आजी माजी संचालक,शिक्षक समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा वंदना देशमुख,सुमन बगले तसेच जुनी पेन्शन हक्क संघटनेचे धनंजय धबधबे,धनाजी खंडागळे, सचिन चांडोले यांनी परिश्रम घेतले.

ज्या एकोप्याने ही निवडणूक लढवून यश संपादन केले त्याच पद्धतीने पतसंस्थेचा चोख कारभार करून जिल्ह्यात नावलौकिक वाढवा. मी तुम्हाला सर्वतोपरी लागेल ती मदत करण्यास तयार आहे.
मा.आ.दीपकआबा साळुंखे पाटील.

पतसंस्थेला मिळालेल्या नवीन संचालकांनी व्रत समजून कारभार करावा व पतसंस्थेचा नावलौकिक वाढवावा.
डॉ. बाबासाहेब देशमुख.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!