महाराष्ट्र

*फॅबटेक पॉलिटेक्निकच्या उज्वल यशाची परंपरा कायम*

सांगोला: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या हिवाळी परीक्षा २०२४ चा निकाल नुकताच जाहीर झाला .या निकाला मध्ये महाविद्यालयातील तब्बल २९४ विद्यार्थ्यानी विशेष प्राविण्यासह म्हणजेच ७५ टक्क्या पेक्षा अधिक गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले.

फॅबटेक पॉलिटेक्निक हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या विषयवार प्रत्येक धड्यावर घेण्यात येणाऱ्या सराव परीक्षा , २५ पेक्षा जास्त कंपनी बरोबर केलेल्या सामजंस्य करारमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच राधानगरी धरण , कोयना धरण , उजनी धरण अदानी थर्मल पॉवर स्टेशन , रॉकेट इंजिनियरिंग, भाभा अणुसंशोधन केंद्र ,गॅमेसा विंड टरबाइन येथील क्षेत्रभेटी , अमूल कॅटल फीड , अल्ट्राटेक सिमेंट या सारख्या प्रतिष्ठित कंपनीतील अधिकाऱ्यांचे व्याख्यान व कॉम्प्युटर च्या पायथॉन सारख्या लँग्वेज वरील कार्यशाळा यामुळे विद्यार्थ्यांच्या तंत्रशिक्षण ज्ञानात भर पडत आहे त्यामुळे पालकांमध्ये देखील या निकाला बाबतीत समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे .

या निकालामध्ये प्रथमवर्षातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातून कु.सुहाना पठाण (९१.४१) कु.श्रीराम काटे (९१.१८) व कु.तन्वी नवले (९०.७१) यांनी अनुक्रमे प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
कॉम्प्युटर सायन्स विभागातून कु.सायली सूर्यवंशी (९०) कु.शितल कुंभार (८९.५३)व सरला अभंगराव (८९.४१) यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
प्रथम वर्ष मेकॅनिकल विभागातून कु.आकाश म्हेत्रे (८९.५३), कु.धनश्री कोळेकर (८७.७७) व कु.वैभवी भोसले (८७.५३) हे विद्यार्थी प्रथम ,द्वितीय व तृतीय आले.
सिव्हिल विभागातून कु.शुभम साळुंखे (८८) ,कु.कोमल मेटकरी (८७.१८) व कु.श्रेया बुरुंगे यांनी अनुक्रमे प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
सेकंड इयर कॉम्प्युटर विभागातून कु.संचीता पवार (९३.४१) प्रथम ,कु.हृषिकेश डोके (८९.७७) द्वितीय व कु.हर्ष हजारे (८८.८२) याने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातील कु.ज्ञानेश्वरी गावडे (९२.२९) कु.सुरभी साखरे (८८.९५) व कु.गणेश मासाळ (८८.७६) यांनी अनुक्रमे प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
द्वितीय वर्ष मेकॅनिकल मधून कु.विशाल हासबे (८४.४४), कु.सिहान शेख (८०.३३) व कु.अभिषेक काळे (७८.८९) यांनी अनुक्रमे प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन मधून कु.आदित्य तोंडले (९०), कु.ज्योती बंडगर (८९.७९) व कु.गीता चिखलकर (८७.६८) हे विद्यार्थी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन मधून कु.पुजा खांडेकर(८९.६७),कु.पायल भुसनर (८८.५६) व कु.सनिका भोसले (८७) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
तृतीय वर्ष सिव्हिल विभागातून कु.साक्षी सूर्यवंशी (८९.४०) कु.शिवानी साळुंखे (८८), व कु.सानिका रुपनर (८६.३०) गुण घेऊन प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
द्वितीय वर्ष सिव्हिल विभागातून कु.पूजा नाळे (८७.०६),कु.गणेश मोटे (८६.९४) व कु.गायत्री कुंभार (८५.५३) यांनी अनुक्रमाने प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री.भाऊसाहेब रुपनर,मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर,कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर,कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय अदाटे आणि पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button