फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पस,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मध्ये राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दि. २१ जून हा दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योग ही भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे योगाचार्य श्री. मिलिंद पतकी यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये योग साधनेव्दारे विद्यार्थी आपल्या मानवी मनाची चंचलता दूर करून एकचित्त होऊन आपल्या शैक्षणिक जीवनात अतिशय चांगली प्रगती करू शकतात आणि शैक्षणिक जीवनात योग्य व धाडसी जीवन पादाक्रांत करू शकतात तसेच व्यसनापासून दूर राहून आपले जीवन यशस्वी करू शकतात, या बद्दल प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय अदाटे यांचा मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, ए.आय.डी.एस. चे विभाग प्रमुख प्रा.डॉ.तानाजी धायगुडे,अकाँऊंट विभागाचे श्री.सुनील टाकळे, प्रा.जय गावडे ,प्रा.उज्ज्वला भगत यांच्या उपस्थित संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल पाटोळे व फिजिकल डायरेक्टर प्रा.प्रभाकर सुतार यांनी केले