कोळा येथील ज्ञानू कोळेकर यांचे निधन..

सांगोला तालुक्यातील कोळा येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानू मारुती कोळेकर यांचे दुःखद निधन झाले. निधना समयी वय ६८ वर्षे होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
लोकनेते किसनराव कोळेकर अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटीचे चेअरमन सोपान कोळेकर यांचे बंधू व इंजिनीयर अनिल कोळेकर इंजिनीयर तानाजी कोळेकर व्यवसायिक जयवंत कोळेकर यांचे वडील होत. ज्ञानू कोळेकर यांच्या जाण्याने कोळे पंचक्रोशीत शोकाकळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा आज मंगळवार २५ जून रोजी सकाळी आठ वाजता बानूरगड रोड कोळेकर वस्ती कोळे येथे होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.