सांगोला तालुका

पृथ्वीराज मोहोळ ठरला तामजाई केसरीचा मानकरी; चिकमहूद (ता. सांगोला) येथे निकाली कुस्तीचे जंगी मैदान संपन्न

सांगोला : चिकमहूद (ता. सांगोला) येथील ग्रामदैवत श्री तामजाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित प्रेक्षणीय निकाली कुस्तीच्या जंगी मैदानात वस्ताद महाबली सतपाल यांचा पठ्ठा पृथ्वीराज मोहोळ याने इराण हसन रामजेनी याच्यावर एक गुण घेऊन तामजाई केसरी चांदीच्या गदेचा मानकरी ठरला.

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते पृथ्वीराज मोहोळ याला चांदीची गदा व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले; तर भोसले तालीम सांगलीचा प्रशांत शिंदे यांनी शिवनेरी तालीम, अकलूजचा सचिन केचे यांची कुस्ती बराच वेळ चालल्याने बरोबरीत सोडवली. तसेच त्रिमूर्ती केसरीचा मानकरी कोल्हापूर गंगावेस तालमीचा कालीचरण सोलनकर याने कोल्हापूर मोतीबाग तालीमचा जितेंद्र मगदूम यास पोकळ घिस्सा डावावर चितपट केले.

प्रारंभी सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सागर पाटील व दिग्विजय पाटील यांच्या हस्ते कुस्त्यांच्या मैदानाचे उद्घाटन झाले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या हस्ते भोसले तालीम, सांगलीचा प्रशांत शिंदे विरुद्ध शिवनेरी तालीम.अकलूजचा सचिन केचे यांची कुस्ती लावून प्रारंभ करण्यात आला. यावेळी चंद्रकांत देशमुख, अभिजित पाटील, भाऊसाहेब रूपनर, कल्याणराव काळे, बाबूराव गायकवाड, तानाजी पाटील, अशोक शिंदे, शहाजी नलवडे, चेतनसिंह केदार, प्रा. संजय देशमुख, आनंद घोंगडे, संभाजी आलदर, बाळासाहेब आसबे, धनंजय काळे.
अरुण नागणे-पाटील यांच्यासह महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेव बद्रे, दत्ता गायकवाड, भीमराव माळी, रावसाहेब नंदीवाले, धनाजी नागणे- पाटील, प्रल्हाद जाधव, आबा रूपनर, हिंमत सोलनकर, दत्ता गायकवाड, आदी उपस्थित होते.

कुस्त्या यशस्वी होण्यासाठी दिग्विजय पाटील, सागर पाटील, रवींद्र कदम, बाळासाहेब भोसले, सुरेश कदम, कालिदास भोसले, महादेव गोडसे, राजेंद्र भोसले, विश्वनाथ फडतरे, देवदत्त भोसले, संतोष सराटे, दादासो बंडगर, एन. वाय. भोसले, महेश पाटील, सुनील कदम, राजू कदम, सतीश भोसले, तानाजी काळेल, वस्ताद गणेश भोसले, किशोर महानवर, ग्रामविकास अधिकारी कोळी, तलाठी गणेश तन्मोर, पोलिस पाटील व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!