फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये रिक्रुटमेंट ड्राईव्हचे आयोजन

सांगोला: येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘मल्टिनॅशनल फार्मसी कंपनी’
गोवा व वेलनेस फॉरएव्हर गोवा या कंपनीच्या वतीने कॅम्पस ड्राईव्हचे
आयोजन दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले आहे. अशी माहिती
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी दिली आहे.

या पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये ‘मल्टिनॅशनल फार्मसी कंपनी’गोवा व
वेलनेस फॉरएव्हर गोवा या कंपनीचे अधिकारी व त्यांचे सहकारी उपस्थित
राहणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील डी फार्मसी च्या व
बी फार्मसीच्या शेवटच्या वर्षांमध्ये शिकत असलेले विद्यार्थी या
रिक्रुटमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होऊ शकतात.
या रिक्रुटमेंट ड्राईव्हचे आयोजन संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब
रूपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री.
दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली
आयोजित करण्यात येणार आहे तरी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. अधिक
माहितीसाठी प्रा. डॉ. संजय बैस ९३५९३७११०५ यांच्याशी संपर्क साधावा.