सांगोला तालुका

कृषी उत्पन्न बाजार समितीवर सांगोला तालुका शेतकरी विकास आघाडीचे वर्चस्व

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुका शेतकरी विकास आघाडीने सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत एकहाती विजय मिळविला. बाजार समितीच्या 16 पैकी 16 जागा जिंकून घवघवीत यश संपादन केले आहे. यापूर्वी 2 जागा बिनविरोध झाल्या होत्या

बहुचर्चित आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 16 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सांगोला तालुका शेतकरी विकास आघाडीचे सर्वच्या सर्व 16 उमेदवार निवडून आले आहेत.
काल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठीचे मतदान सांगोला शहर, जवळा, महुद आणि नाझरा या मतदान केंद्रावर शांततेत पार पडले. मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर सायंकाळी 6 च्या सुमारास सांगोला पंचायत समिती बचत भवन येथे मतमोजणी पार पडली. या वेळी सांगोला शहर आणि तालुक्यातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध गावचे पुढारी, नागरिक उपस्थित होते.
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 16 जागेसाठी तब्बल 44 जण रिंगणात होते. यापूर्वी सांगोला तालुका शेतकरी विकास आघाडीचे चंद्रकांत करांडे, आणि दगडु गावडे यांची बिनविरोध निवड झाली होती. निवडून आलेल्या उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्याची अतिषबाजी केली. सदर मतमोजणी दरम्यान सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

 कृषी उत्पन्न बाजार समिती,सांगोला या कृषी, पणन आणि सहकार संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये शेतकरी विकास आघाडी च्या सर्व उमेदवारांनी भरघोस मतांनी विजय संपादन करून कृषी उत्पन्न बाजार समितीवर स्व.आबासाहेबांच्या विचारांचा,विकासाचा झेंडा दिमाखात फडकवला त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.संचालक रुपाने जनसेवेची ,संस्थेच्या प्रगतीसाठी मिळालेली ही संधी सोन्यात रुपांतरीत कराल हा विश्वास असून कार्य करत रहा,सदैव आम्ही पाठीशी राहू
डॉ.बाबासाहेब देशमुख

विजयी उमेदवार
* सहकारी संस्था मतदार संघ- भज.विजा.विमाप्र.:-श्री.संतोष हरिदास देवकते
* सहकारी संस्था मतदार संघ-इ.मा.प्र.- श्री.दिपक बाळासाो गोडसे
* सहकारी संस्था मतदार संघ-महिला राखीव:- प्रमिला शिवाजी चौगुले, शोभा विजय पवार
* सहकारी संस्था मतदार संघ -सर्वसाधारण- श्री.आबासाो ज्ञानू आलदर, श्री.बाळासाो निवृत्ती काटकर, श्री.विनायकराव अनंतराव कुलकर्णी, श्री.अमोल मुरलीधर खरात, श्री.धनाजी गणपत पवार, श्री.हेंमतकुमार साहेबराव शिंदे, श्री.विष्णू नामदेव सरगर
* ग्रामपंचायत मतदार संघ- अनु.जाती/जमाती- श्री.माणिकचंद ताराचंद वाघमारे
* ग्रामपंचायत मतदार संघ-सर्वसासाधारण- श्री.समाधान शेषनारायण पाटील, श्री.किशोर भानुदास शिंदे,
* व्यापारी मतदार संघ-श्री.अमजद शब्बीर बागवान, श्री.रामचंद्र नारायण बाबर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!