सांगोला तालुका

इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांचे मार्फत किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य विषयक शिबिर.

सांगोला(प्रतिनिधी):-इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांचे मार्फत मीरा मुलींचे वस्तीगृह, लकडे बिल्डिंग, विद्यानगर, पेट्रोल पंपाच्या पाठीमागील वस्तीगृहातील मुलींसाठी आरोग्यविषयक शिबिर घेण्यात आले . सदर शिबिरामध्ये डॉक्टर सुपर्णाताई केळकर यांनी मार्गदर्शन केले.
मुलींनी आपली आरोग्य विषयक काय काळजी घ्यावी ? व कश्या प्रकारे दक्षता घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मुलींच्या शरीरामध्ये होणारे बदल याविषयीची माहिती देण्यात आली. त्यामध्ये त्यांनी मुलींच्या शरीर रचनेमध्ये कशा पद्धतीने बदल होत असतात. ते बदल वयाच्या कोणत्या टप्प्यात सुरू होतात? मुलींनी हे बदल कशा पद्धतीने स्वीकारले पाहिजेत ? या काळात मुलींनी कसे वागले पाहिजे याबाबत सखोल माहिती दिली. मुलींचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नाला त्यांनी समर्पक उत्तर दिली. त्याचप्रमाणे त्या वयामध्ये मुलींनी घ्यावयाची आरोग्य विषयक काळजी, स्वच्छते विषयक काळजी, त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारचा आहार त्यांनी घेतला पाहिजे याबाबतची माहिती डॉक्टर सुपर्णाताई केळकर यांनी दिली. गरज वाटल्यास डॉक्टरांची मदत घेण्याची व घरच्यांशी मोकळा संवाद ठेवावा असे सांगितल
प्रस्तावना सचिव सौ.स्वाती अंकलगी यांनी केली. सदर कार्यक्रमासाठी क्लबचे अध्यक्षा उमा उंटवाले, वर्षा बलाक्षे, सचिव स्वाती अंकलगी, पास्ट प्रेसिडेंट मंगल लाटणे, उपाध्यक्ष सविता लाटणे आणि कविता दिवटे हे उपस्थित होते. तसेच वस्तीगृतील शिक्षक व वसतिगृहातील मुली उपस्थित होते. एक अतिशय नाजूक विषय डॉ. सुपर्णाताई केळकर यांनी अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगीतला. उपाध्यक्ष सविता लाटणे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!