डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त सांगोला येथे महास्वच्छता अभियान संपन्न; 701 श्री सदस्यांनी गोळा केला 163 टन कचरा

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला शहरात महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून बुधवार दि.1 मार्च रोजी सांगोला शहरात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले
सदर अभियानाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी 7 वाजता मुख्याधिकारी श्री सुधीर गवळी यांचे हस्ते श्री गणेश पूजन करून, छ. शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. तसेच या अभियानाची सांगता ही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आली.
मुख्याधिकारी श्री सुधीर गवळी साहेब म्हणाले की, प्रतिष्ठानचे आजचे कार्य बघून आम्ही सर्व भारावून गेलो आहोत. या प्रतिष्ठान ने आज पर्यंत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केले व ते उत्तम रीतीने पूर्ण केले आहेत. ज्या मध्ये वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, जलपुनर्भरण, या क्षेत्रा मध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. आज तुम्ही आमचा सत्कार करण्यापेक्षा आम्ही सांगोला नगरपरिदेच्या वतीने तुम्हा सर्व श्रीसदस्यांचा सत्कार आणि त्यांनी सन्मानपत्र देऊन सत्कार केला. व या पुढे प्रतिष्ठानच्या प्रत्येक समाज उपयोगी कार्यक्रमात नगर पालिका संपूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.
या वेळी आरोग्य अधिकारी श्री विनोद सर्वगोड म्हणाले की, प्रतिष्ठानकडून गणेश उत्सवाच्या वेळी निर्माल्य गोळा केले व त्यापासून कंपोस्ट खत तयार करून आलेगाव येथे लागवड केलेल्या 1500 झाडांना घालून पर्यावरण संरक्षणाचे खुप मोठे कार्य केले आहे. स्वच्छता मोहीम पूर्ण करून शहर स्वच्छ झाल्याची भावना सर्व प्रशासन व नागरिकांतून व्यक्त होत आहे. स्वच्छता मोहिमेमधील प्रतिष्ठानच्या 701 सदस्यांचे मान्यवरांनी कौतुक केले.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे सामाजीक बांधिलकीची जाणीव ठेवून सतत स्वचच्छता अभियान,वृक्षरोपण आणी संवर्धन, रक्तदान शिबीरे,शैक्षणीक साहित्य वाटप, आरोग्य शिबीरे, धरणातील गाळ काढणे आदी ऊपक्रम राबविले जातात याचीही आठवण उपस्थित पाहुण्यांनी करुन दिली .
सांगोला शहरात डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने महास्वच्छता अभियान संपन्न झाले,. यावेळी सांगोला तालुक्यातील 701 श्री सदस्यांच्या माध्यमातून 163 टनाच्या पुढे ओला व सुका कचरा गोळा करून कचरा डेपो मध्ये पाठवण्यात आला. यासाठी नगरपरिषद सांगोला कडून 8 घंटागाडी , 2 टिप्पर, , 1 जेसीबी तसेच श्री सदस्यांकडून 17 ट्रॅक्टर, 6 छोटा हत्ती यांच्या माध्यमातून सर्व कचरा गोळा केला गेला. यासाठी मुख्याधिकारी श्री सुधीर गवळी, कार्यालय अधीक्षक अधिकारी श्री विजय कन्हेर, आरोग्य अधिकारी श्री विनोद सर्वगोड यांचे विशेष सहकार्य मिळाले.