सांगोल्यातील जनावराचा आठवडा बाजार पाच मार्चपासून सुरू होणार – आमदार शहाजीबापू पाटील

गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेल्या सांगोला येथील जनावरांचा बाजार सुरू करण्यासाठी दिनांक २४फेब्रुवारी रोजी सांगोला येथे आमदार शहाजीबापू पाटील व सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली होती या बैठकीनंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी केल्यानंतर तात्काळ पालकमंत्री यांच्याकडून जिल्हाधिकारी सोलापूर यांना लंपी या रोगाच्या धर्तीवर बंद असणारा सांगोल्यातला महाराष्ट्रातील सर्वात मोठा जनावराचा बाजार चालू करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर जनावराचा बाजार भरण्यास परवानगी मिळाली आहे
लंपी आजाराची खिलार गायी व संकरित गायी जनावरांना लागण झाल्यामुळे सप्टेंबर २०२२ पासून जिल्हाधिकारी सोलापूर यांचे आदेशाने पश्चिम महाराष्ट्रातील जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असणारा जर रविवारी भरण्यात येणारा सांगोला येथील जनावराचा आठवा बाजार बंद केला होता परंतु आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्याने हा बाजार आता सुरळीत येणाऱ्या पाच मार्च पासून चालू होणार आहे अशी माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे तसेच जनावराच्या बाजारसाठी उपयुक्त उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत.