कोळा येथील विलास कोळेकर याचे राज्यसेवा परीक्षेत यश

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेमध्ये सांगोला तालुक्यातील कोळा (कोंबडवाडी) येथील विलास शिवाजी कोळेकर याने क्लासवन अधिकारी पदी परीक्षेत राज्यात ७३ वा क्रमांक मिळवून यश घवघवीत संपादन केले आहे. त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोळ्यासारख्या कोंबडवाडी मध्ये ग्रामीण डोंगरी भागात राहणाऱ्या विलास कोळेकर जिद, चिकाटी मेहनत घेत पुणे शहरामध्ये रात्र दिवस अभ्यास करून हे यश मिळवले असल्यामुळे कोळा परिसरातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे त्याची निवड झाल्याचे समजताच कोळा गावात एसटी स्टँड चौकात फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. राज्यातील अनेक युवकांनी यश संपादन केले आहे. कोळा गावाला संधी मिळाल्याने गावाच्या शिरपेचात मानाचा तोरा रोवला गेला आहे राज्यसेवेची वर्ग १ वर्ग यामध्ये सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाल्याने निवड विलास कोळेकर याची निवड झालेल्या युवकांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.