जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्री.संदिप खुळपे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी येथील शाळा व्यवस्थापन समितीची मासिक सभा मंगळवार दिनांक २८/०२/२०२३ रोजी जि.प.प्रा.शाळा बलवडी येथे संपन्न झाली. सर्व प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोहर पवार सर यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले.अध्यक्षपदी .श्री संदिप खुळपे यांची निवड करण्यात आली तर ग्रामपंचायत सदस्या मधून स्विकृत सदस्य म्हणून मा .श्री कृष्णदेव कारंडे गुरुजी यांची निवड करण्यात आलीआहे .नुतन अध्यक्ष श्री संदिप खुळपे यांचा सत्कार मा . सरपंच श्री विजयदादा शिंदे यांचे हस्ते करण्यात आला.तसेच मा.श्री कृष्णदेव कारंडे गुरुजींचा सत्कार मा.सरपंच बाळासाहेब/प्रसाद शिंदे यांचे हस्ते करण्यात आला. मा.श्री विजयदादा शिंदे यांनी अध्यक्षांना शुभेच्छा देऊन शाळेविषयी मार्गदर्शन केले.सभेच्या अध्यक्षस्थानी मा.सरपंच श्री ज्ञानेश्वर राऊत.उपसरपंच श्री समाधान शिंदे, ग्रामपंचायत सदस्य रविराज शिंदे,मा.श्री.सत्यजित लिगाडे सरकार, मा.श्री गणेश कमले,मा.श्री.संजय पंडीत शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री निलेश राऊत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री चांगदेव शिंदे,श्री तात्यासो वाकडे,श्री गोरखनाथ बनसोडे सर, सौ.संगिता ढोबळे मॅडम, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षण प्रेमी ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक/सचिव श्री मनोहर पवार सदर प्रसंगी उपस्थित होते.शाळेच्या विविध विषयावर चर्चा होवून मंजुरी देण्यात आली.शेवटी शाळेतील शिक्षक श्री माणिक मिसाळ गुरुजी यांनी सर्वांचे आभार मानले.