फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न; *विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनि.
कॉलेजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय
विज्ञान दिवसाची सुरुवात विज्ञान दिंडीने झाली.प्राचार्य सिकंदर पाटील व
स्कूलमधील विज्ञान शिक्षक यांच्या हस्ते विज्ञान दिंडीचे उद्घाटन करण्यात
आले.

 

या दिंडीमध्ये विविध  शास्त्रज्ञ यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी
केल्या होत्या.या विज्ञान दिंडीमध्ये विविध वैज्ञानिक फलक हातात घेऊन
घोषणा देत विज्ञान दिंडी काढण्यात आली.विज्ञान प्रदर्शनासाठी प्रमुख
पाहुणे कॅम्पस डायरेक्टर श्री.संजय अदाटे, स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर
पाटील,ए. ओ . वर्षा कोळेकर, सुपरवायझर सौ.वनिता बाबर हे लाभले. तर
विज्ञान प्रदर्शनासाठी परिक्षक म्हणून डॉ.युवराज नवले,प्रा.ऐश्वर्या
कुलकर्णी ,प्रा.स्वाती लोकरे हे उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते
प्रतिमा पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.याप्रसंगी इ.सातवीतील
अनुक्रमे कु.अनुष्का केदार,कु.अन्वी कांबळे,कु.वैष्णवी खरात,कु.अजय पवार
इ.आठवीतील कु.प्रसाद अलदर,कु.आदर्श स्वामी या विद्यार्थ्यांनी
डॉ.सी.व्ही.रमण यांच्या जीवनाबद्दल माहिती,रमण इफेक्ट, विविध शास्त्रज्ञ
व त्यांचे शोध इ.माहीती दिली.प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी आपल्या
मनोगतातून देशाचा विकास करण्यासाठी विज्ञानाची कास धरली पाहिजे असे
सांगून विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

डॉ.युवराज नवले सरांनी विद्यार्थ्यांनी सतत नवोपक्रम,व सर्जनशील असे विद्यार्थ्यांना सांगितले,
श्री.निसार इनामदार सरांनी विद्यार्थ्यांना विज्ञानात रुची घेवून अभ्यास
कसा करावा हे सांगितले.यानंतर फॅबटेक संस्थेच्या डायरेक्टर सौ.सारीका
रूपनर यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन झाले. प्रदर्शनात एकूण
१९० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी
जलपुनर्भरण, रस्ता सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, भूकंप, पवनचक्की व वीज
निर्मिती, सौरऊर्जा,धरणांची प्रतिकृती,ए. टी.एम, जलशुद्धीकरण प्रकल्प
इ.प्रयोग व प्रात्यक्षिके करून दाखविले.विज्ञान प्रदर्शनासाठी पालकांनी
उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी विज्ञान
विभाग प्रमुख श्री.निसार इनामदार, सुपरवायझर सौ. वनिता बाबर, विज्ञान
शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.संस्थेचे चेअरमन श्री.भाऊसाहेब रूपनर,
मॅनेजिंग डायरेक्टर प्रा डॉ.अमित रूपनर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री.
दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, स्कूलचे प्राचार्य
श्री. सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
प्रा.रेश्मा तोडकर यांनी केले.आभार सौ.कोमल पवार यांनी व्यक्त केले.
‌.विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button