सांगोला तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना मिळाली मृत जनावरांची नुकसान भरपाई
सांगोला : सांगोला तालुक्यात महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वारे अवकाळी पावसात आलेगाव, सावे, – लिगाडेवाडी, जुनी लोटेवाडी सातारकर वस्ती व नवी लोटेवाडी येथे वीज पडून मृत पावलेल्या जनावरे, शेळ्या बोकड यांच्या – नुकसानीपोटी नैसर्गिक आपत्ती राज्य निधीतून सुमारे १ लाख ८६ हजार रुपयाचे धनादेश ५ शेतकऱ्यांना वितरित केल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगितले.
सांगोला तालुक्यात मागील महिन्यापूर्वी अवकाळी पावसात वीज – अंगावर पडून मृत पावलेल्या जनावरांच्या नुकसानीपोटी लिगाडेवाडी येथील अजित काकासो शिंदे यांची म्हैस (३७,५०० रुपये), नवी लोटेवाडी सातारकर वस्ती पोपट बापू सावंत यांची जर्सी गाय (३७,५०० रुपये), आलेगाव सयाजी निवृत्ती बाबर यांची जर्सी गाय व तिची पाडी (५७,५०० रुपये), सावे येथील आनंदा मारुती शेजाळ यांची जर्सी गाय (३७,५०० रुपये), जुनी लोटेवाडी येथील गोविंद दामू लवटे यांच्या दोन शेळ्या, एक बोकड व शेळीचे पिल्लू असे मिळून १६ हजार रुपये असे एकूण सुमारे १ लाख ८६ हजार रुपये धनादेश संबंधित शेतकऱ्यांना वितरित केले.