जुनोनी येथे स्मशानभूमी मध्ये चोरी; शव दाहिणी स्टॅण्डच्या पळविल्या पट्ट्या

सांगोला(प्रतिनिधी):-स्मशानभूमीमधील शव दाहीणी स्टॅण्डमधील बिडाचे काशटिंग असलेल्या 60 हजार रुपये किंमतीच्या पट्ट्या अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची घटना 30 जून रोजी रात्रीच्या सुमारास जुनोनी ता.सांगोला येथे घडली.
जुनोनी स्मशानभूमीमध्ये ग्रामपंचायत मार्फत मार्च 2023 मध्ये पंधरावे वित्त आयोगामधून शव दहाणी स्टॅन्ड बसविले होते. काल शनिवारी 01 जुलै रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयाचे क्लार्क संजय वाघमारे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतकडुन जुनोनी स्मशानभूमीमध्ये बसवलेले शव दाहीणी स्टॅण्ड 30 जून रोजी सांयकाळी 06 वाजण्याच्या सुमारास पाहिले त्यावेळी ते व्यवस्थित होते, परंतु काल सकाळी 10 वाजता पाहिले असता शव दाहीणी स्टैंडमधील बिडाचे काशटिंगअसलेल्या पट्ट्या दिसुन आल्या नाहीत, असे सांगितल्याने दादासो आडसुळ, संजय वाघमारे, रााजेद्र पाटील व आबासो व्हनमाने जावुन पाहिले असता सदरचे शव दाहीणी स्टॅण्डमधील बिडाचे कार्टिंग असलेल्या पट्टया त्याचे नट बोल्ट काढुन घेवुन गेले आहेत. आजुबाजुचे परिसरात त्याचा शोध घेतला असला त्या मिळुन आल्या नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.सदर चोरीची फिर्याद दादासो आडसुळ रा, जुनोनी ता, सांगोला यांनी दिली आहे.