पहाटेचा शपथविधी अखेर साक्षात उतरला! महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई: अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत शरद पवारांच्या नेतृत्वाला रामराम केला आहे. अजित पवारांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
पहाटेच्या शपथविधीनंतर आता दुपारच्या शपथविधीच्या चर्चा होणार आहे. पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्योराप झाले होते. पहाचेच्या शपथविधीनंतर 72 तासात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार पडले होते. मात्र, आता दुपारी अजित पवार यांनी शपथविधी घेतली आहे. अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे ,धर्मरावबाबा अत्राम,संजय बनसोडे ,अनिल पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.
अजिप पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे. राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारचं नव्हे तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले आहेत. सध्या राजभवनात खासदार सुनील तटकरे आणि अमोल कोल्हे हे दोन्ही खासदार उपस्थित आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.