संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने शैक्षणिक साहित्य व सायकलींचे वाटप

वासुद(वार्ताहर):- संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मर्यादित वासुद यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वासुद, बाबर मळा सपताळ मळा व केदार मळा तसेच जय हनुमान विद्यालय वासुद येथील विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले त्याचबरोबर जी विद्यार्थी दूरवरून शाळेत येत आहेत अशा गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.अध्यक्षस्थानी वासुद गावच्या सरपंच सौ.जयश्री अरुण केदार होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रांताधिकारी आकाश लिगाडे म्हणाले, गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पर्यावरण पूरक जीवनशैली असली पाहिजे, वृक्षारोपण, लायब्ररी, व्यायामशाळा, खेळाचे मैदान, देवराई इत्यादी गोष्टी गावामध्ये असणे गरजेचे आहे. समाजामध्ये चांगले काम करून पुढील पिढीनी समाज उपयोगी कामाचे नियोजन करण्यास सांगितले त्याचबरोबर अकोले गावामध्ये समाज परिवर्तनाचे काम कसे चालू आहे व चिपळूण शहरात स्वच्छता म्हणून कशी राबविले हे सांगत संस्थेचे अध्यक्ष व सदस्य व समाज उपयोगी कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार्या ग्रामस्थांची कौतुक केले.
भाजपा तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी समाज उपयोगी कामातून गावचा विकास करण्यासाठी कटिबध्द आहोत तसेच सुदाम भोरे यांनी संस्थेला कोणतीही अडचण आल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले.
वासुद गावामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल नवनाथ केदार, सावित्री हवेली, समृद्धी केदार, सचिन गव्हाणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर गावातील माजी सैनिक तसेच सैनिकांच्या पत्नींचा सन्मान चिन्ह देऊन गैरव करण्यात आला.
कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक विष्णुपंत केदार, सदानंद शिंदे, सरदार केदार, डॉ.निरंजन केदार, अरुण केदार, सावंत सर, पवार सर, पोरे सर, हवेली मॅडम उपस्थित होते.प्रास्ताविक श्री बाळासाहेब सावंत यांनी, सूत्रसंचालन उत्कर्ष चंदनशिवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सचिन शिंदे, सुनिल सावंत, सौदागर केदार, जगदिश केदार, प्रमोद सावंत, संजय गव्हाणे यांनी परिश्रम घेतले.