सांगोला विद्यामंदिरचा ७१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; संस्था कार्यकारणी सदस्य प्रफुल्लचंद्र झपके यांचे हस्ते ध्वजारोहण

३ मार्च हा सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व सांगोला विद्यामंदिर प्रशालेचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. शुक्रवार दि.३ मार्च २०२३ रोजी ७१ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला.
सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष कै.चं.वि.तथा गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास संस्था सचिव मं.श. घोंगडे यांचे हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. व ७१व्या वर्धापन दिनानिमित्त सां.ता. शि. प्र.मंडळाचे कार्यकारणी सदस्य प्रफुल्लचंद्र झपके यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमास सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी व शिक्षक,शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यामंदिर परिवारातील प्रशासकीय अधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेश आटपाडीकर यांनी तर पर्यवेक्षक पोपट केदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पूज्य गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी आपल्या विचाराने आणि कर्तृत्वाने व सकस अध्यापनाने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा, कौशल्यांचा, जीवनदृष्टीचा,जीवनशैलीचा विकास केला. एवढेच नव्हे तर प्रत्येक विद्यार्थी अधिक उन्नत, अधिक व्यापक ,अधिक समृद्ध, अधिक परिपूर्ण अधिक निकोप करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच सांगोला विद्यामंदिरचे अनेक विद्यार्थी नामवंत,ज्ञानवंत,कलावंत, गुणवंत झाले. व आजही हा प्रवास सुरू आहे.वर्धापनदिनाच्या निमित्ताने सिंहावलोकन करताना पूज्य बापूसाहेबांचे तत्व,विचार व दृष्टिकोन याला प्रमाण मानून सां.ता.शि.प्र.मंडळ,सांगोला या संस्थेने विधायक व्यवस्थापनातून वेगवेगळ्या शाखेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची चौफेर प्रगती केली आहे.त्यामुळे विद्यामंदिर परिवार गुणवत्तेत अग्रेसर आहे.याचा सार्थ अभिमान आहे.
प्रा.धनाजी चव्हाण