महानंदा देविदास कोठावळे यांचे दुःखद निधन

सांगोला (वार्ताहर) सांगोला शहरातील प्रमोद देविदास कोठावळे यांच्या मातोश्री श्रीमती महानंदा देविदास कोठावळे यांचे शुक्रवार दि.03 मार्च 2023 रोजी पहाटे अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा,मुली,जावई,सूना,नातवंडे असा मोठा परिवार असून आपल्या प्रेमळ आणि बोलक्या स्वभावामुळे व कष्टातून फुलवलेल्या संसारामुळे समाजास त्या परिचित होत्या.
तिस-या दिवसाचा विधी रविवार दि.05 मार्च 2023 रोजी लिंगायत स्मशानभूमी वाढेगाव नाका येथे होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.