सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

आपला उमेदवार कमळ, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विजयाला प्राधान्य द्यावे – राजकुमार पाटील 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे. प्रत्येक बूथ भक्कम करावा, मतदार यादी पोहोच करावी. ५१ टक्के मते मिळवण्यासाठी प्रत्येकाला पूर्णवेळ काम करावे लागेल. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा लाभ घेतला नाही असा एकही लाभार्थी नाही हे शोधूनही सापडणार नाहीत. पाच वर्षे खासदारांनी कामे केली असल्याने त्यांना पुन्हा निवडून द्यायचे आहे. तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. सत्तेत असलो तरच आपण विकास करू शकतो. माढा लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार कमळ आहे हेच ध्यानात ठेवून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विजयाला प्राधान्य द्यावे असे आवाहन माढा लोकसभा संयोजक राजकुमार पाटील यांनी केले.
शुक्रवार १५ मार्च रोजी भाजपचे बूथ संमेलन सांगोल्यात पार पडले. यावेळी माढा लोकसभा संयोजक राजकुमार पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, संभाजी आलदर, तालुकाध्यक्ष अतुल पवार, दुर्योधन हिप्परकर, डॉ.विजय बाबर, नवनाथ पवार , शिवाजीराव गायकवाड, विस्ताराक अनंत राऊत, हणमंत करचे, आनंद फाटे यांच्यासह भाजपचे सुपर वॉरियर्स, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.
     यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, प्रत्येक बूथ प्रमुख सक्षम करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. तालुक्यात भाजपचे पक्ष संघटन मजबूत झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांसोबत चर्चा करायची आहे. पार्टी इलेक्शन मोडवर असल्याने प्रत्येक बूथ प्रमुख, शक्ती केंद्र केंद्र प्रमुख, वॉरियर्सनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. जो भाजपचे प्रामाणिकपणे काम करतो, त्या व्यक्तीला लाभ मिळतोच. तालुक्यातील प्रत्येक गावाला खा.रणजितसिंह निंबाळकरांनी निधी दिला आहे. रस्ते, स्ट्रीट लाईट दिले आहेत. कोणी काहीही म्हणो, विकासाची कामे महायुतीच्या सरकारने केली आहेत. मराठा आरक्षणासाठी आतापर्यंतच्या मराठा मुख्यमंत्र्यांनी काहीही काम केले नाही. मराठा समाजाला आरक्षण फक्त देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, विरोधकांनी कुरघोड्या करून आरक्षण घालवले. ब्राह्मण असल्याने फडणवीसांना टार्गेट केले जात. असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!