सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

दूध दरवाढीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी

दुध दरवाढीसाठी आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंखे -पाटील यांनी मंत्रालय येथे घेतली भेट

सांगोला येथे १४ नोव्हेंबर रोजी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील व दीपकआबा साळूंखे पाटील हे सांगोला महूद रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आले होते तेव्हा सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी खासदार रणजित सिंह नाईक -निंबाळकर व आमदार शहाजीबापू पाटील व दीपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडे दुधाला दर परवडत नसल्याची खंत बोलून दाखवली होती दुधाला दरवाढ करावी अशी मागणी केली होती यावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी काल दिनांक १७ नोव्हेंबर रोजी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दूधदर वाढीची मागणी केली

 

यावेळी देवेंद्र फडणीस साहेब यांच्याशी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील व दीपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब बागा उध्वस्त झाल्या असल्याने इतर पिकांना हमीभाव नसल्याने सध्या शेतकऱ्यांच्या समोर एकमेव दूध व्यवसायाच उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे अशा परिस्थितीमध्ये दुधाचे कमी झालेले दर शेतकऱ्याला परवडणारे नाहीत हे दर असेच राहिले तर शेतकऱ्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे शेतकरी अडचणीत सापडणार आहे या सर्व अडचणी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासमोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी मांडल्या.

 

त्यावर देवेंद्र फडणीस साहेब यांच्याकडून दूध दरवाढीसाठी तात्काळ समितीची नेमणूक करून दूध दरवाढ केली जाईल असे आश्वासित केले त्याचबरोबर जे खाजगी किंवा सहकारी दूध संघाने दूध दर कमी दिलेले आहेत त्याही दुध संघांना शासनाने ठरविले दराप्रमाणे दूध दर शेतकऱ्यांना देण्यास भाग पाडू आम्ही दूध दर वाढीसाठी सकारात्मक असून लवकरच समितीचा अहवाल मागवून घेऊन दूध दरवाढीचा निर्णय घेणार आहे आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले त्यामुळे लवकरच दुध दर वाढ होणार असल्याने शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!