जागतिक महिला दिनानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने महिलांना गुलाब पुष्प व भेटवस्तू

सांगोला (प्रतिनिधी )- जागतिक महिला दिनानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने पालावर राहणाऱ्या महिलांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन महिला दिन साजरा करण्यात आला.
सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. रोजी रोटी साठी भटकंती करत गावोगावी फिरत काबाड कष्ट करणाऱ्या कुटुंबातील महिलांना त्यांच्या राहत्या पालावर जाऊन गुलाब पुष्प व पाण्यासाठी स्टील कळशी भेटवस्तू देऊन जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. ज्यांना जागतिक महिला दिन म्हणजे काय? हेही माहित नाही, अशा महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल त्या महिलांनाही मोठा आनंद झाला. व त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, प्रमोदकाका दौंडे, महादेव दिवटे, दादा खडतरे आदी उपस्थित होते.