महूद येथे भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध

महूद, ता. २४ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमांना जोडे मारो आंदोलन करून महूद(ता.सांगोला)येथील शिवप्रेमी तरुणांनी त्यांचा निषेध केला.
महूद येथील मुख्य चौकात शिवप्रेमी तरुण एकत्र झाले.या तरुणांनी भगतसिंह कोश्यारी व भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.छत्रपती शिवराय व महापुरुषांबद्दल सातत्याने अपशब्द वापरणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमांना शिवप्रेमी तरुणांनी जोडे मारून काळे फासले.
यावेळी माजी उपसरपंच दिलीप नागणे,बाबुराव नागणे,कैलास खबाले,सचिन जाधव, मोहन जाधव,प्रल्हाद जाधव,मेघराज पाटील,संतोष पवार,दत्तात्रय नागणे, सचिन काशीद,महेश नागणे,प्रताप नागणे,प्रवीण नागणे,अजय नागणे, अविनाश नागणे,पप्पू नागणे यांच्यासह शिवप्रेमी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.