रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने वाढेगाव येथे वृक्षारोपण

रोटरी क्लब सांगोला यांनी आतापर्यंत 500 झाडे लावलेली आहेत. आत्ता पाऊस पडल्यानंतर पुन्हा एकदा वृक्षारोपणास सुरुवात केली आहे.
वाढेगाव ग्रामस्थ यांच्या मदतीने 200 झाडे लावण्याचा उपक्रम केला. वृक्ष जगतील तर मानव जात जगेल हे यावर्षीच्या उन्हाळ्यातील दाहकतेवरून वरून सिद झाले आहे. वाढेगाव या ठिकाणी सुज्ञ नागरिकांनी ही गरज ओळखून झाडे लावण्यासाठी फार मोठी मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेअंतर्गत संपूर्ण वाढेगाव हे वृक्षमय होत आहे. या गावाचा आदर्श सर्व पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावा अशी ही मोहीम आहे. गावातील तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी या मोहिमेत भाग घेतला आहे. तरी सर्व गावांमधून ही मोहीम राबविणे अत्यंत आवश्यक आहे.
या वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये रोटरी क्लब सांगोलाच्या वतीने अध्यक्ष डॉ. साजिकराव पाटील सचिव सचिन पाटकुलकर रो. मधुकर कांबळे रो. विकास देशपांडे रो. विलास बिले रो. विशाल बेले रो.शरणाप्पा हळळीसागर रो.इंगोले सर.रो.डॉ.सोनलकर रो. श्रीपती आदलिंगे रो. संतोष भोसले रो अशोक गोडसे रो. डॉक्टर अनिल कांबळे इ . सभासद हजर होते.व ग्रामस्थांच्या वतीने वैजनाथ काका घोंगडे, संजय डोईफोडे (सरपंच प्रतिनिधी)अनंद आळतेकर, रवी कुंभार, राहुल घोंगडे (ग्रा. पंचायत सदस्य), सौदागर दादा दिघे, विजयकुमार जाधव सर, रामहरी नलवडे,शिवाजी दिघे(उपसरपंच) बंडू पवार, बंडू दिघे, संजय दिघे, सुरेश पाटील, सौरभ भगत, अजय रोडगे हे हजर होते तसेच तालुका कृषी अधिकारी शिंदे सर सुद्धा हजर होते.सर्वांच्या योगदानाबद्दल वाढेगाव ग्रामस्थांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.