शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेस दिनांक 12/06/2024 पासून सुरुवात झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. बी. आर. गायकवाड व कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. ए. देशमुख यांनी दिली.
थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्र (6471) ला मान्यता मिळाली असून दिनांक बुधवार 12/6/2024 पासून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थी ज्यांचा पीसीएम ग्रुप आहे तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी अभियांत्रिकी पदविकेच्या थेट द्वितीय वर्षास प्रवेश घेऊ शकतात त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सीईटी परीक्षेची आवश्यकता नाही. विद्यार्थी दिनांक 12/6/2024 ते 03/07/2024 या कालावधीत प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवडून ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे तसेच आपल्या प्रवर्गासाठी कागदपत्रांची पडताळणी करून आपला प्रवेश अर्ज निश्चित करू शकतात. दिनांक 05/07/2024 रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करण्यात येतील. विद्यार्थी त्यांच्या प्रवेश अर्जात काही त्रुटी असल्यास दिनांक 06/7/2024 ते 09/7/2024 यादरम्यान दुरुस्त्या करून घेऊ शकतात.
मंडळाच्या संकेतस्थळावर दिनांक 11/07/2024 रोजी अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करण्यात येतील. सांगोला, जत, मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, संबंधित कागदपत्रे जमविताना येणाऱ्या अडचणी व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला येथे सुविधा केंद्र असून याचा फायदा पालकांनी घ्यावा असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष श्री. बी. आर. गायकवाड व सचिव श्री. ए. आर. गायकवाड यांनी केले. सन 2024-25 च्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेसाठी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज मधील सुविधा केंद्रातील सर्व यंत्रणा सज्ज असून विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी सुविधा केंद्र प्रमुख प्रा. एस.बी.चंदनशिवे यांच्याशी 9172598699 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान प्राचार्य. डॉ. आर. ए. देशमुख यांनी केले.