दीपक खटकाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाटंबरे येथे वृक्षारोपण

वाटंबरे :- वाटंबरे येथे मान नदी तीरावरती दत्त मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. युवासेनेचे तालुकाप्रमुख दीपक उर्फ गुंडा दादा खटकाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाटंबरे ग्रामस्थांचा वतीने कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने चिंच,,जांभूळ,वड,पिंपळ,आंबा इत्यादी वृक्ष लावण्यात आले.स्वतंत्र अशी या वृक्षांना संजीवनी देण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली.
या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सागर दादा पाटील हे होते.वाढदिवसाचे औचित्य साधून केलेल्या वनराई या सामाजिक कार्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले.याप्रसंगी गुंडादादा खटकाळे महादेव बापू पवार,सरपंच नामदेव पवार,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विकास पवार,चेअरमन नाना पवार,ग्रा पं सदस्य खंडू पवार,मा सरपंच असिफ मुलाणी,धीरज पवार,संजय पवार,धीरज पवार,राहुल शेठ,विनायक पवार,ग्रा पं सदस्य आरमान मुलाणी, व युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.