सांगोला तालुका

शहरातील फेरीवाल्यांचे व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी कटीबध्द – आनंदा माने ; जागेचे लिलाव न काढता आधीच्याच जागा फेरीवाल्यांना भाडेतत्वावर देण्याची मागणी

सांगोला शहरातील वंदे मातरम चौक येथे जागा धरून भाड्याने देण्याच्या हेतूने व रस्त्यास अडथळा होते असल्यामुळे तेथील अतिक्रमण काढण्याबाबतची मागणी आम्ही केली होती. परंतू काही लोकांनी याबद्दल शहरामध्ये गैरसमज पसरवून संपूर्ण शहरातील सरसकट अतिक्रमण काढा, अशी मागणी केल्याने नगरपालिका प्रशासनाने राजकीय दबावाखाली संपूर्ण शहरातील अतिक्रमण काढले आहे. तरी शहरातील ज्या फेरीवाल्यांचे चालू व्यवसाय बंद झाले आहेत, अशा फेरीवाल्यांचे व्यवसाय पुन्हा सुरू करण्याबाबत आ. शहाजीबापू पाटील व मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांना भेटून गोरगरीबांचे व्यवसाय पुन्हा सुरू करू, असे आश्वासन माजी नगरसेवक आनंदा माने यांनी दिले आहे.
तसेच शहरामध्ये ठिकठिकाणी बाहेरचे लोक येवून सदरच्या जागेवर अतिक्रमण करून ती जागा भाडेतत्वावर देण्याचे प्रकार सुध्दा वाढले होते. अशा लोकांची अतिक्रमणे निघाल्यामुळे त्यांच्याकडून या अतिक्रमणाबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे प्रकार सुध्दा झाले आहेत. परंतू सरसकट अतिक्रमण काढण्याची मागणी कुणी केली होती, हे नागरिकांना चांगलेच माहित आहे.
त्याचबरोबर महानगरपालिका/ नगरपालिका फेरीवाला व्यवसायाचे (विनियमन) आदर्श उपविधी 2009 अंतर्गत मुख्याधिकारी यांनी शहर फेरीवाला समितीची स्थापना करून शहरामध्ये फिरता फेरीवाला व स्थिर फेरीवाला अशी वर्गवारी करून त्यांना व्यवसाय करण्यासाठी नगरपालिकेने परवाना द्यावा. तसेच फेरीवाल्यांकरीता शहरामध्ये जागांचे नियोजन करावे. शक्यतो, मुख्याधिकारी यांनी जागांचे लिलाव न काढता पहिले फेरीवाले ज्याठिकाणी होते, तीच जागा त्यांना वार्षिक भाडेतत्वावर द्यावी, अशी मागणीही आनंदा माने यांनी केली आहे.
अतिक्रमणामुळे ज्यांचे व्यवसाय बंद झाले आहेत, अशा सर्वांना लिलाव न काढता आधी होती तीच जागा नगरपालिकेने भाडेतत्वावर द्यावी, याबाबतच्या मागणीकरीता आमच्या गटामधील शहराच्या माजी लोकनियुक्त सौ. राणीताई माने, मा. उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर व आमचे इतर नगरसेवक यांच्यासमवेत तालुक्याचे आ. शहाजीबापू पाटील व मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांची भेट घेवून फेरीवाल्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार.
– आनंदा माने, माजी नगरसेवक तथा गटनेते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!