फॅबटेक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये नीट, सीईटी २०२३ क्रॅश कोर्सचे उदघाटन

सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल व
ज्युनिअर कॉलेज मध्ये नीट, सीईटी २०२३ क्रॅश कोर्सचे उदघाटन संस्थेचे
चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर,
फॅबटेक कोचिंग अकॅडमीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रा.अजय वसगडे, संस्थेचे
कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात
आले.यावेळी व्यासपीठावर सर्व विषय तज्ज्ञ उपस्थित होते.या सर्वांची प्रा.
अजय सरांनी विद्यार्थ्यांना ओळख करून दिली तसेच त्यांचा मान्यवरांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला. एनटीए द्वारे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या
परीक्षेनंतर प्रवेश परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना वैद्यकीय,
इंजिनिअरिंग, औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी
मिळते. नीट परीक्षेची काठीण्य पातळी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक
प्रयत्न करावे लागतात. नीट परीक्षेत संपादन केलेल्या गुणांच्या आधारे
वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित केले जातात. तर एमएचटी सीईटीचे
गुण संपादन करून इंजिनिअरिंग व औषधनिर्माणशास्त्राचा प्रवेश निश्चित केला
जातो. अशी माहिती त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर म्हणाले कि, ग्रामीण
भागातील विद्यार्थी सुद्धा महान शास्त्रज्ञ व पुढे राष्ट्रपी होऊ शकतो
असे सांगून डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे उदाहरण सांगितले. ग्रामीण
भागात असे विद्यार्थ्यी आहेत की, त्यांची बौद्धिक क्षमता चांगली आहे.
विद्यार्थी अभ्यासाची तयारी करतो पण सुयोग्य मार्गदर्शन, अभ्यासाची दिशा,
सराव याची माहिती विद्यार्थ्यांना व पालकांना व्यवस्थित मिळत नाही. काही
पालकांची मुलांना परगावी शिक्षणासाठी पाठवण्याची आर्थिक परिस्थिती बेताची
असते. यासाठी स्वर्गीय बिरासाहेब रूपनर यांच्या दूरदृष्टिकोनातून
सांगोला सारख्या ग्रामीण भागात फॅबटेक शैक्षणिक संकूल सुरू केले आहे.
यामध्ये इंजिनिअरिंग,पॉलिटेक्निक,फार्मसी
स्कूल व ज्युनिअर कॉलेज या सारखे कोर्स सुरु केले आहेत. क्रॅश कोर्स
करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचणी आल्यास त्या आम्ही
तात्काळ सोडविण्यास प्रतिबद्ध आहोत असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
दिल्या.
प्रा.डॉ. अमित रूपनर यांनी फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर
कॉलेजमध्ये नीट,एमएचटी-सीईटी, क्रॅश कोर्स आजपासून सुरु होत असून
याठिकाणी हा क्रॅश कोर्स ५५ दिवसांचा आहे. या क्रॅश कोर्स बद्दल
विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली व विद्यार्थ्यांनी
आत्मविश्वासाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेच्या युगात यशस्वी व्हावे असे
सांगून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सिकंदर पाटील
यांनी क्रॅश कोर्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या गुणवत्ता
वाढीसाठी संस्थेने सर्व सोयींनी युक्त अशा कलास रूम्स, सुसज्ज ग्रंथालय,
डिजिटल क्लासरूम, वसतीगृहाची सोय, भोजनाची सोय, सुरक्षिततेसाठी
सीसीटीव्ही. कॅमेरे, विद्यार्थी केंद्रीत मार्गदर्शन, आयआयटी अनुभवी व
नेट क्वालीफाईड तज्ञ शिक्षक वृंद,विषयानुसार दोन शिक्षक, ऑनलाइन टेस्ट,
७४ टेस्टचा प्रोग्राम, बेस्ट क्वालिटी अभ्यास साहित्य, सुयोग्य
मार्गदर्शन, नैसर्गिक वातावरण अशा सर्वगुण संपन्न शैक्षणिक सोयीबद्दल
विद्यार्थ्यांना माहिती दिली.
फॅबटेक कोचिंग क्लासचा विद्यार्थी ऋषभ पाटील याने ९९.४६
टक्के मार्क्स पाडून तो सध्या २३ लाखाचे पॅकेज घेत असून त्याने आपला
कोचिंग क्लास्सेसचाअनुभव विद्यार्थ्यांना शेर केला. यावेळी
मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी
क्लासेसचे यादव सर,खोत सर,फुटाणे सर,गोदे सर यांचाही यावेळी सत्कार
करण्यात आला.यावेळी पृथ्वीराज जाधव,श्रावणी पुजारी,मयुरी गोरड व अंजली
गायकवाड यांनी फॅबटेक कोचिंग अकॅडमी बद्दल व शिक्षकांबद्दल आपले विचार
मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल बिडवे यांनी तर आभार अश्विनी
गावडे यांनी मानले.