म.सा.प.,इनरव्हील क्लब, लायन्स क्लब सांगोला कडून महिला दिनानिमित्त कवी संमेलन संपन्न

सांगोला ( प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सांगोला, इनरव्हील क्लब सांगोला व लायन्स क्लब सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने येथील हॅप्पी पार्क मध्ये कवी संमेलन संपन्न झाले. यामध्ये कवितेच्या बहारदार सादरीकरणाने आस्वादक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर कवी संमेलनासाठी निमंत्रित कवी व कवयित्रींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर म.सा.प.सांगोला अध्यक्ष ला.प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष व सांगोला शेतकरी सूतगिरणीचे चेअरमन डॉ. प्रभाकर माळी, इनरव्हील क्लब अध्यक्षा सौ. उमा उंटवाले व सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण उपस्थित होते.
कवी संमेलनामध्ये कवी सुनील जवंजाळ, ज्ञानेश डोंगरे, शिवाजी बंडगर कवयित्री पुष्पलता मिसाळ,सुशीला नांगरे पाटील,योजना माहिते, श्लेषा कारंडे यांनी वेगवेगळ्या विषयावरील कवितेचे बहारदार सादरीकरण केले.कविसंमेलनाचे सूत्रसंचालन कवी सुनील जंवजाळ यांनी केले.
कार्यक्रमासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सांगोला इनरव्हील क्लब सांगोला व लायन्स क्लब ऑफ सांगोला पदाधिकारी, सदस्य, सभासद, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत डॉ.प्रभाकर माळी व प्रास्ताविक प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले.सूत्रसंचालन ज्ञानेश्वर माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन ला. प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले..
या कवी संमेलनामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सौ.शीला झपके, सुहास गायकवाड यांचे उत्स्फूर्तपणे कविता सादरीकरण व त्रिगुणे मॅडमचे कवी संमेलनाच्या आयोजनाबद्दलचे मनोगत अनेकांना प्रेरणा देणारे ठरले..