नंदेश्वर येथे देवसागर साधक ट्रस्ट यांच्यावतीने पाणपोई सुरू

नंदेश्वर ता मंगळवेढा येथील देवसागर साधक ट्रस्ट नंदेश्वर यांच्यावतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी पाणपोई सुरू केली असून या पाणपोईचे उद्घाटन श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
सद्यस्थितीला दिवसेंदिवस बाटलीबंद पाण्याला महत्व प्राप्त झाले असून मात्र ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना विकतचे पाणी घेणे शक्य नसते या सामाजिक हेतूने प्रत्येक वर्षी देवसागर साधक ट्रस्ट हे नंदेश्वर बसस्थानकासमोर शुद्ध व थंडगार पाणी सर्व प्रवाशांना,शालेय विद्यार्थ्यांना,वाटसरूंना मिळावे म्हणून नंदेश्वर बसस्थानकासमोर पाणपोईचे उद्घाटन करून या ठिकाणी पाण्याचे शुद्ध जार ठेवण्यात आलेले आहेत.
या पाणपोईच्या उद्घाटनप्रसंगी देवसागर साधक ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर लाड,कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मोटे,माजी सरपंच गेणा दोलतडे,माजी उपसरपंच राहुल कसबे,भारत गरंडे,उद्योजक विशाल कळकुंबे,म्हाकु दोलतडे, विष्णू कुंभार,संजय बिदरकर, दिलीप गडदे,संजय कोडगिर,भगवान गडदे,बाबुराव गरंडे,काशिलिंग वाघमोडे,यशवंत भोसले,वामन करे,हिरालाल शेख, बापू चौंडे,दादा जोरवर,श्याम लाड,रामदास कुंभार,काशिनाथ कसबे,शत्रुघ्न कळकुंबे,अतुल कसबे,संतोष माने यांच्यासह नंदेश्वर ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवसेंदिवस उन्हाचे प्रमाण वाढत चालले असून बसस्थानकावर येणाऱ्या महिला,कॉलेजचे युवक- युवती व प्रवाशांना शुद्ध व थंडगार पाणी मिळावे या सामाजिक हेतूने प्रत्येक वर्षी आम्ही पाणपोई सुरू करतो.
शिवशंकर लाड- देवसागर साधक ट्रस्ट-अध्यक्ष