अहिल्या अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्यावतीने गुणवंताचा सत्कार संपन्न

जुनोनी(वार्ताहर):-कोळे गावचे सुपुत्र शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेले अनुकूल परिस्थितीमधून मेहनत आणि अथक परिश्रम घेत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माननीय श्री विलास शिवाजी कोळेकर यांनी एमपीएससी परिक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करत वर्ग 1 पदी अधिकारी म्हणून निवड झालेबाबत तसेच तिप्पेहाळी गावचे सुपुत्र श्री शंकर अरुण बजबळकर यांची भूमि अभिलेख अधिकारी पदी निवड झालेबाबत अहिल्या अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड जूनोनी या संस्थेच्या वतीने संस्थेचे चेअरमन अॅड. श्री दह्याप्पा आनंदा आलदर, व्हा चेअरमन श्री तानाजी तुकाराम व्हनमाने तसेच सर्व संचालक मंडळ, सभासद आणि कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीमध्ये अहिल्या परिवारातर्फे या यशस्वी युवकांचा शाल, फेटा व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या सर्व मंडळींच्या उपस्थिती मध्ये संस्थेचे चेअरमन अॅड श्री दह्याप्पा आनंदा आलदर यांचा शाल व श्रीफळ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी आपल्या संस्थेचे चेअरमन अॅड श्री दह्याप्पा आनंदा आलदर यांनी आपल्या खेडे गावातील युवा पिढीला एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना कोणती काळजी घ्यावी तसेच स्पर्धा परीक्षा मध्ये कसे यश संपादन करता येईल याबाबत मार्गदर्शन करावे अशी विनंती करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्ती श्री विलास कोळेकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की अधिकारी म्हणून शासकीय सेवेत काम करत असताना प्रामाणिकपणे सेवा करत आपल्या सारख्या खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गर्शन करू व गावात आदर्श युवक घडावा यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देत आपल्या संस्थेचे आभार मानले.
तसेच सत्कारमूर्ती श्री शंकर बजबळकर यांनी आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमासाठी श्रीमंत बजबळकर, अण्णासो श्रीराम, भालचंद्र व्हनमाने, ईश्वर सरगर, डॉ सुधाकर कांबळे, पोपट तवटे, दशरथ मदने, शरद कोळेकर, दत्ता व्हणमाने टेलर, अजिंक्य तेली आदी मान्यवर तसेच संस्थेचे कर्मचारी व पिग्मी एजंट उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे मॅनेजर चंद्रशेखर साखरे यांनी तर आभार दशरथ मदने सर यांनी मानले.