सांगोला तालुकामहाराष्ट्र

एल के पी मल्टीस्टेट मुळे शहराच्या विकासात मोलाची भर पडली-नगराध्यक्षा सिंधुताई गावडे; कवठेमहांकाळ शाखेचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):- महाराष्ट्र व कर्नाटक अशी दोन राज्य कार्यक्षेत्र असलेल्या एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या शाखेमुळे कवठेमंकाळ शहराच्या वैभवात मोठी भर पडली आहे. क्रांती अग्रणी सांगली जिल्ह्यातील महाकाली मातेचा आशीर्वाद लाभलेल्या या शहरातील व्यापार व उद्योगधंद्याच्या वाढत्या गतीला अधिक चालना देण्यासाठी ही संस्था अत्यंत उपयुक्त असल्याचेही गौरवोद्गार शहराच्या नगराध्यक्षा सिंधुताई गावडे यांनी व्यक्त केले.
एल के पी मल्टीस्टेटच्या कवठेमहांकाळ शाखेचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंचावर अष्टविनायक पतसंस्थेचे चेअरमन नगरसेवक विश्वनाथ पाटील, गटनेते व नगरसेवक अजित माने, एल के पी संस्थेचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले, व्हॉइस चेअरमन सुभाष दिघे गुरुजी, संचालक डॉ. बंडोपंत लवटे, नगरसेवक रणजीत घाडगे, जगन्नाथ शिंदे, तुकारामकाका पाटील, शिक्षक बँकेचे संचालक अजित पाटील, शिक्षक नेते अशोक पाटील, कोंगनोळी गावचे माजी उपसरपंच प्रमोद मेनगुदले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला प्रस्ताविकामध्ये संस्थेचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी संस्थेच्या ठेवीच्या विविध प्रकारच्या आकर्षक योजनांची माहिती सांगितली. एलकेपी कन्यादान योजना , एलकेपी पेन्शन योजना याबरोबरच अवघ्या शंभर दिवसांच्या ठेवीवर देखील ही संस्था दहा टक्के इतका व्याजदर देते. 46 ते 90 दिवसांकरिता सात टक्के व्याजदर देण्यात येत असून मुदतीच्या टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन तेरा महिन्यांच्या पुढे ही संस्था साडेबारा टक्के इतका व्याजदर देते . ज्येष्ठ नागरिक , अपंग, महिला भगिनी याचबरोबर आपले प्राण हातात घेऊन देशसेवेसाठी सैन्य दलामध्ये सेवा केलेल्या माजी सैनिकांसाठी ही संस्था अर्धा टक्के जादा व्याजदर देते. तसेच कर्जाचे देखील अनेक प्रकार सांगत आरटीजीएस, एनईएफटी ,आयएमपीएस या सारख्या व्यापारी बांधवांसाठी देण्यात येत असलेल्या अनेक सोयी सुविधांबद्दलची माहिती दिली.
संस्थेचे संचालक जगन्नाथ भगत गुरुजी यांनी संस्था आणि संचालकांबद्दल अधिकची माहिती सांगितली. संस्थेच्या संचालकांना आर्थिक संस्था चालवण्याचा सुमारे 18 – 20 वर्षापासूनचा मोठा अनुभव असून सहकाराच्या माध्यमातून उद्योग आणि व्यवसायांमध्ये त्यांनी मोठी भरारी घेतलेली आहे. हे सर्व व्यवसाय व उद्योग सोलापूर जिल्हा आणि परिसरामध्ये सुरू असून विशेषतः दुग्ध व्यवसायामध्ये संस्थापक अनिलभाऊंच्या मार्गदर्शनाखाली व सह संस्थापक डॉ. बंडोपंत लवटे यांच्या अथक परिश्रमामधून नुकताच या उद्योग समूहाने दैनंदिन एक लाख लिटरचा टप्पा ओलांडला असल्याचीही माहिती भगत यांनी यावेळी बोलताना दिली.
यावेळी सलगरे गावचे सरपंच उद्योजक तानाजी पाटील, शिक्षक नेते अशोक पाटील, विश्वनाथ पाटील इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते दिलीपकाका पाटील, विस्ताराधिकारी कृष्णदेव पाटील, पोपटदादा गेंड, धनाजी माळी ,विशाल पवार, उद्योगपती संभाजी खांडेकर, उद्योजक महिपतलाल चौधरी, विजय शेट्टी ,कुमार पाटील, महादेव पवार, संदीप भैय्या पाटील , उद्योजक पप्पू पाटील यांचे सह अनेक व्यापारी शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एल के पी मल्टीस्टेट या संस्थेच्या दोन राज्यांमध्ये मिळून 43 शाखांना शासन मान्यता असून अनेक शहरे व मोठी बाजारपेठा असलेल्या गावामधील छोटे-मोठे उद्योजक , व्यापारी बांधव व व्यावसायिकांसाठी ही संस्था वरदान ठरत असल्याचाही भावना यावेळी अनेकांनी बोलून दाखविल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!