सांगोला विद्यामंदिर व लायन्स क्लब सांगोला कडून प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचा सत्कार संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष व लायन्स क्लब प्रांत ३२३४ ड१ चे माजी प्रांतपाल प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर यांची नुकतीच आदर्श नागरी सहकारी पतसंस्था सांगोला चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे सत्कार करण्यात आला.
सांगोला विद्यामंदिर व प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने प्राचार्य लक्ष्मण जांगळे यांच्या हस्ते व लायन्स क्लब सांगोला कडून लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी शाल व बुके देऊन प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांचा सत्कार केला. यावेळी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सचिव म.शं.घोंगडे,उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभीषण माने, लायन्स क्लब सांगोला सचिव ला.उन्मेष आटपाडीकर, खजिनदार ला.प्रा.नवनाथ बंडगर,सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व लायन्स क्लब सांगोला पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.