सांगोला तालुका

सांगोला नगरपरिषदेकडून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा; पाककला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, महिलांचे ग्रुप डान्स स्पर्धा व होम मिनिस्टर उत्साहात संपन्न

सांगोला: महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभर उत्साहात साजरा करण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून सांगोला नगरपरिषदेच्या वतीने शहरातील महिलांसाठी विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पाककला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, महिलांचे ग्रुप डान्स स्पर्धा व होम मिनिस्टर यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक २ मार्च रोजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील ५१ स्पर्धकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ.सुधीर गवळी,मुख्याधिकारी, श्री. शिवाजीराव शिंदे,तालुका कृषी अधिकारी, श्रीम.छाया यादव मॅडम यांनी काम पाहिले.

पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक स्नेहल मडके, द्वितीय क्र. श्रीम. स्वाती ढोले, तृतीय क्र. श्रीम. गीता दौंडे यांचा तर उत्तेजनार्थ म्हणून श्रीम. अपर्णा एडगे, श्रीम. स्वाती गुळमिरे व श्रीम. शुभांगी तेली यांचा क्रमांक आला.

यानंतर दि. ३ मार्च रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील ३५ स्पर्धकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री राजेंद्र जाधवसर, श्रीम.पल्लवी थोरात मॅडम, श्रीम.कविता पाटील मॅडम यांनी काम पाहिले. प्रथम क्रमांक श्रीम. रेश्मा दिवटे, द्वितीय क्र. श्रीम. वैजंती दौंडे, तृतीय क्र. श्रीम. श्रध्दा तेली यांचा तर उत्तेजनार्थ म्हणून श्रीम. गायत्री पाटणे, श्रीम.अश्विनी घोंगडे, श्रीम.कल्याणी बेडके यांचा क्रमांक आला.

 

 

दि. ०९ मार्च रोजी ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १० ग्रुप तर प्रेक्षक म्हणून ५०० ते ६०० इतक्या महिला उपस्थित होत्या. डान्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जय हो ग्रुप, द्वितीय क्र. लयभारी ग्रुप, तृतीय क्र. शौर्य ग्रुप यांचा तर उत्तेजनार्थ म्हणून शिवकन्या ग्रुप, मिलेनियम ग्रुप यांचा क्रमांक आला. यामध्ये परीक्षक म्हणून श्री. सतीश गेजगेसर व श्रीम. गौरी राऊत हे उपस्थित होते. दि. १० मार्च रोजी होम मिनिस्टर,व्याख्यान व बक्षीस वितरण इ. कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी श्रीम. योजना मोहिते यांनी ८ मार्च निमित्त लिंग भेदभाव याविषयी व्याख्यान दिले. यावेळी होम मिनिस्टर या मजेदार खेळाच्या माध्यामातून तीन स्पर्धकांना पैठणी भेट देण्यात आली. लकी ड्रॉच्या माध्यमातून उपस्थितांना विविध बक्षिसांचे वाटप करण्यात आले. उपरोक्त प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व बक्षीसाच्या रक्कमेच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. राणीताई माने, लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा, सौ. स्वातीताई मगर, माजी उपनगराध्यक्षा, सौ.छायाताई मेटकरी, माजी नगरसेविका, सौ.शोभाताई घोंगडे, माजी नगरसेविका, सौ.सुनंदा घोंगडे, अध्यक्षा, कर्तव्य शहरस्तर संघ, डॉ.सुधीर गवळी, मुख्याधिकारी,नगरपरिषद,सांगोला श्री. शिवाजीराव शिंदे, तालुका कृषी अधिकारी व श्री. विजयकुमार कन्हेरे, कार्यालयीन अधीक्षक हे उपस्थित होते. सदरचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीम. तृप्ती रसाळ, कर निरीक्षक, श्रीम. तेजश्री बगाडे, शहर समन्वयक, प्रतिभा कोरे, योगेश गंगाधरे,सहा.प्रकल्प अधिकारी, बिराप्पा हाके, समुदाय संघटक यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

———————————–

शहरातील महिलांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादामुळेच सदर कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत झाली. यापुढेही शहरातील बचत गटातील व इतर महिलांसाठी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या करिता नगरपरिषदेच्या माध्यमातून असे विविध कार्यक्रम राबविण्यात येतील.
डॉ.सुधीर गवळी, मुख्याधिकारी, नगरपरिषद,सांगोला.

—————————————————–

नगरपरिषदेने महिलांकरिता ८ मार्च निमित्त घेतलेले विविध स्पर्धा या कौतुकास्पद आहेत. यापुढेही नगरपरिषदेने असे स्तुत्य उपक्रम महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने घ्यावेत हीच अपेक्षा.
– सौ.राणीताई माने, माजी नगराध्यक्षा, नगरपरिषद,सांगोला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!