सांगोला तालुका

क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख व नावलौकीक कौतुकास्पद- डॉ.निकीताताई देशमुख;

सांगोला (प्रतिनिधी):- क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्थेने गेल्या दोन वर्षात गरजू महिलांना मदतीचा हात देवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. संस्थेकडून महिलांच्या अडचणी जाणून घेवून महिलांना उद्योगधंदे उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगत पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख व नावलौकीक कौतुकास्पद असल्याचे डॉ.निकीताताई देशमुख यांनी व्यक्त केले.
क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा व्दितीय वर्धापन दिन व स्थलांतर सोहळा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.निकीताताई देशमुख बोलत होत्या.
प्रारंभी रतनबाई गणपतराव देशमुख व डॉ.निकीताताई बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते नूतन वास्तूमध्ये फित कापून उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर स्वागतगीत व प्रतिमापूजन करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड, चेअरमन भाग्यश्री बनकर, माणगंगा परिवार पतसंस्थेच्या चेअरमन सौ.अर्चना इंगोले, संचालिका दिपाली बनकर, निलाबाई अनंतकवळी, सुशिला बनकर, उर्मिला नवले, राणी बनकर, रेश्मा बनकर, भारती बनकर, गीता खडतरे, वैष्णवी शिंदे, तृप्ती बनकर, राणी बनकर, अ‍ॅड.चैत्रजा बनकर, मनिषा बनकर आदी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी जयमालाताई गायकवाड, संस्थेच्या संचालिका उर्मिला नवले यांनी महिला दिनानिमित्त मार्गदर्शन, संस्थेच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड.चैत्रजा बनकर यांनी महिला विषयक कायदे, सल्लागार मनिषा बनकर यांनी महिलांना येणार्‍या अडचणी याविषयी मार्गदर्शन करुन उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे डॉ.प्रभाकर माळी, सीए.उत्तम बनकर, सीए.के.एस.माळी, शिवाजीनाना बनकर, सुरेश माळी, तानाजी केदार गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त करुन संस्थेच्या कामकाजाचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाप्रसंगी सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक को.ऑप.क्रेडिट सोसायटीचे नूतन संचालक मुरलीधर गोडसे, नयना पाटील, बाळासाहेब बनसोडे त्याचप्रमाणे सर्टिफाईड ऑडिटर मणेरी, आर्किटेक्चर इंजि.प्रविण शिंदे यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त विधीज्ञा बनकर, सिध्दी बनकर, श्रेया बनकर, ज्ञानेश्वरी बनकर या विद्यार्थीनीनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात संस्थापक रामचंद्र बनकर म्हणाले की, संस्थेने दोन वर्षात 8 कोटी 63 लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. संस्थेकडे 8 कोटी रुपयांच्या ठेवी असून संस्थेकडे 9 कोटी 80 लाख रुपयांचे खेळते भांडवल असून सभासदांच्या व हितचिंतकांच्या जोरावर यापुढील काळात संस्थेकडून वेगवेगळ्या सुविधा देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
वर्धापन दिनानिमित्त मारुतीआबा बनकर, अतुल पवार, प्रविण नवले, विजय राऊत, अच्युत फुले, डॉ.प्रविण बनकर, सीए.तुषार ढेरे, साधू गोडसे, श्रीपती आदलिंगे, वसंत फुले, तंडे गुरुजी, चंद्रकांत गोडसे, सुशांत फुले, अशोक बनकर, विठ्ठल बनकर, संभाजी बनकर, दत्तात्रय राऊत त्याचप्रमाणे डॉ.राजेश्वरी कोरे मॅडम, अंजली उकळे मॅडम, सचिन गोडसे सर यांनी उपस्थित राहून संस्थेच्या कामकाजाचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक रामचंद्र बनकर, चंद्रकांत बनकर, बाळासाहेब बनकर, रमेश बनकर, गणेश माळी, सचिन बनकर, सोमनाथ बनकर, अभिजीत बनकर, दत्तात्रय ज्योतिराम बनकर, अजित बनकर,अमित बनकर, रोहित बनकर, संदिप बनकर, योगेश बनकर, गणेश बनकर, युवराज बनकर, सोहम बनकर, महादेव चौधरी, ओंकार बनकर, शुभम बनकर यांच्यासह संस्थेच्या सर्व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!