सांगोला तालुकाशैक्षणिक

बलवडी येथे डॉ.इंद्रजीत धायगुडे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न

नाझरे(प्रतिनिधी):- वैद्यकीय क्षेत्रात सांगोला तालुक्यातील अनेक विद्यार्थी प्रवेश घेत आहेत ही बाब कौतुकास्पद असून परराज्यात जाऊन डॉ इंद्रजीत यांनी प्रवेश घेऊन नानांच्या विचारांवर पुढे वाटचाल केली असून त्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असे मत पुरोगामी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
बलवडी ता सांगोला येथील डॉ इंद्रजीत सुरेश धायगुडे यांची B.V.S.C.R.R College of veterinary and animal science Rajsthan येथे निवड झाल्याबद्दल बलवडी येथे 10 मार्च रोजी सायंकाळी भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख बोलत होते.
डॉ शिवाजीराव ढोबळे यांनी बलवडी गावाचे नाव वाढविले त्याप्रमाणे इंद्रजीतनेही नाव उंचवावे व यासाठी पालकांनी ही मुलाकडे लक्ष देणे गरजेचे आहे म्हणजे अनेक इंद्रजीत घडतील असे मत सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख यांनी व्यक्त केले.
बलवडी गाव शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असून डॉ.मदने यांनी सुरेश धायगुडे याला घडविले व त्यामुळे इंद्रजीत यांनी गावाचे नाव उंचवावे व बलवडी ते पंढरपूर ही एसटी कॉलेज बस सुरू झाल्याने गावाची प्रगती झाली असे सुरुवातीस माजी सरपंच बाळासो शिंदे यांनी सांगितले.
यावेळी पशुधन विकास अधिकारी एन डी मदने, जी.एस मगर, दादासो बाबर, सुब्राव बंडगर, डॉ शिवाजीराव ढोबळे खरेदी-विक्री चेअरमन इंजि.रमेश जाधव, ऋषिकेश देशमुख, पंढरीनाथ नागणे, शिवाजी शिंदे, सरपंच माऊली राऊत, संजय विभुते, श्रीमंत गवंड, विजय देशमुख, हनुमंत सरगर, पिंटू बंडगर, दर्‍याबा बंडगर, प्रसाद शिंदे, उपसरपंच समाधान शिंदे, विकास मोहिते, पोपट गडदे, सुनील चौगुले, शिक्षक नेते भिवा कांबळे, अशोक पाटील, अ‍ॅड. सत्यजित लिगाडे, उल्हास धायगुडे, राजू अडसूळ, विजय धायगुडे, राजू बंडगर, आबा सांगोलकर, संजय सरगर, सचिन कंडरे, शिवाजी सरगर, शहाजहान मुलाणी, अनुप देशपांडे, प्रमोद कवडे, पत्रकार रविराज शेटे, डॉ पताळे यांच्यासह धायगुडे परिवार, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन तात्यासो शिंदे गुरुजी यांनी तर आभार माजी सरपंच विजयदादा शिंदे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!