सांगोला तालुका

माजी उपनगराध्यक्ष कै. लक्ष्मण सदाशिव मदने सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

सांगोला शहरातील मदने चौक येथील माजी उपनगराध्यक्ष कै. लक्ष्मण सदाशिव मदने सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन जेष्ठ विधीज्ञ उदयबापु घोंगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. सचिन देशमुख, ग्रंथमित्र गुलाबराव पाटील (सर), मोहन मस्के (सर),  सतिश भाऊ सावंत यांचे शुभहस्ते रविवार दि. १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता संपन्न झाले.
 यावेळी बोलताना अॅड. उदयबापु घोंगडे यांनी दर्जेदार वाचनालय स्थापन झाल्यास लुप्त होत चाललेली वाचन संस्कृती नव्याने उभारी घेईल अशी आशा व्यक्त केली तसेच या वाचनालयातील विविध विषयांवरची पुस्तके पाहुन समाधान व्यक्त केले.
 आपल्या भाषणात अॅड. सचिन देशमुख यांनी कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, भावनिक आणि मानसिकदृष्टया व्यक्तीला परिपक्व होण्यास वाचन मदत करते. प्रत्येक पुस्तके आपल्याला शिकण्यासाठी नवीन संधी देत असते तसेच या वाचनालयास सर्वोतोपरी मदत करू असे सांगितले. जेष्ठ पत्रकार मोहन मस्के सर, माजी नगरसेवक सतिश भाऊ सावंत यांनी आपल्या मनोगतात या वाचनालयास सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी प्रा. काकासाहेब नरुटे (सर), बहुजन नेते बापुसाहेब ठोकळे, डॉ. निशीकांत पापरकर, सिए. तुषार ढेरे, आबासाहेब शेजाळ गुरूजी, रा. कॉग्रेस मागासवर्गीय संघटनेचे तालुका अध्यक्ष चंचल (भैया) बनसोडे, अॅड. सागर बनसोडे, डॉ. संजय मदने, श्यामराव सावंत, रमेश कोकरे, दादासाहेब खरात (सर), रेवणभाऊ मदने, तानाजी मदने, बाळासाहेब मदने, शंकर दादा खटकाळे, महेश भंडारे, अँड. सुयश बनसोडे, संजय गडदे, संदेश बुराडे, ज्ञानेश्वर उबाळे, नवनाथ कुंभार, रमेश गायकवाड, अक्षय भंडारे, विठ्ठल खांडेकर, तानाजी शिंगाडे, मदनराज मदने, विश्वेश्वरया स्वामी, यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक किशोर बनसोडे (सर) यांनी केले तर आभार वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दिपक मदने यांनी व्यक्त केले. शुभम मदने, तानाजी फडके, सिताराम वाघमारे, यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!