सांगोला तालुकाशैक्षणिक

राजे शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

सांगोला(प्रतिनिधी):-राजे शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ.सुधीर ढवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री पांडुरंग कोकरे सर , अनकढाळ गावच्या सरपंच सौ.वैशाली बंडगर, मुख्याध्यापक काटे सर तसेच इतर सर्व मान्यवर, शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.÷
या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रणदिवे सर यांनी तर आभार श्री.काटे सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!