व्हिडिओ सर्वेक्षण पथकाचे काम पूर्ण

253 सांगोला विधानसभा मतदारसंघातील फिरते पथक स्थिर सर्वेक्षण पथक व राजकीय पक्षाचे प्रचार सभा यांचे कडील आलेल्या सी.डी.ची नोंद घेऊन सर्व सी.डी. काळजीपूर्वक पाहून आचारसंहिता बाबत कांही आक्षेपार्य बाबी आढळून आल्यास चित्रीकरणाची वेळ नमूद करून स्पष्ट अभिप्रायसह चित्रीकरणातील सभेचे ठिकाण वेळ कोणत्या उमेदवाराची सभा आहे रॅली, किंवा पदयात्रा, कॉर्नर सभा आहे अखंड चित्रीकरण आहे का पाहणे व याबाबतचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी भैरप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे तहसीलदार यांच्याकडे सादर करणे या कामी दोन व्हिडिओ सर्वेक्षण पथकाची नेमणूक केली आहे
पथक प्रमुख दिपाली शेंडे,व रेणुका गवल ह्या असून यांचे पथकामध्ये पुनम गिरी, जयश्री भोसले , प्रतिभा पवार, भाग्यश्री पाटील नंदा चव्हाण,व आरती शिनगारे यांचेमार्फत चित्रीकरणाची तपासणी सुरू असून आत्तापर्यंत 188 सी.डी.चे पाहणी पूर्ण झाली असून त्याबाबतचा झालेला खर्चाचा अहवाल खर्च नियंत्रण पथकास अकाउंट विभागास सादर केल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी दिली आहे



