महाराष्ट्र
रोटरी क्लबच्या वतीने सांगोला येथे पाणपोईचे उद्घाटन

सध्या सांगोला शहरातील उन्हाळा वाढत चालला आहे. लोकांना उन्हाचे चटके जाणवला सुरुवात झाली आहे. लोकांच्या सोयीसाठी शहरातील सामाजिक संस्था रोटरी क्लब सांगोला यांनी सानिका मोबाईल ॲक्सेसरीज यांच्या सहकार्याने नेहरू चौक येथे पाणपोई सुरू केली आहे.
या पाणपोई मध्ये थंड पाण्याचे जार ठेवण्यात आले आहेत.याचा सर्व लोकांना फायदा होणार आहे.या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे या उपक्रमाचा हेतू विषद केला. याप्रसंगी रो.इंजि.विलास बिले रो.इंजि.हमिद शेख,रो. दीपक चोथे,रो.सुरेश आप्पा माळी,रो. इंजि.मधुकर कांबळे,रो.इंजि.अशोक गोडसे,श्री.बोत्रे व इतर नागरिक उपस्थित होते. या प्रकल्पासाठी सानिका मोबाईल ॲक्सेसरीजचे रो. धनाजी शिर्के यांचे बहुमोल सहकार्य लाभले.