सांगोला तालुका

राजुरी येथे नियमबाह्य माती उत्खनन केलेल्या जागांची  तहसीलदार यांनी पाहणी केली; तातडीने कारवाई व्हावी-अशोक आबा नरळे यांची मागणी…

राजुरी येथे  नियमबाह्य माती उत्खनन केलेल्या जागांची  तहसीलदार संजय खडतरे यांनी पाहणी केली असून तातडीने कारवाई व्हावी अशोक आबा नरळे यांनी मागणी  केली आहे .
सांगोला तालुक्यातील राजुरी येथे महादेव तलाव या नावाने परिचीत असलेल्या शेत जमिनीमधून नियमबाह्य रीतीने श्री महादेव कृष्णा बाड यांनी अंदाजे ३०००० ब्रास मातीची वाहतूक  करुन विल्हेवाट लावलेली आहे. सदर शेतीच्या भागाची मोजणी होऊन वहिवाटीच्या सीमा आणि हद्दी कायम नसताना मोघम पद्धतीने ३० फुट खोलीचा आणि १०० फुट लांबलचक अक्राळ विक्राळ पद्धतिचा धोकादायक खड्डा निर्माण करुन शेतजमनीच्या मातीची विक्री करुन विल्हेवाट लावलेली आहे.
सदर माती उचललेल्या भागाला लागून श्री अशोक नरळे यांच्या मालकी हक्कांची शेतजमिन आहे. सदर केलेल्या नियमबाह्य व खोल धोकादायक खड्यामुळे श्री नरळे यांची जमिन खचून सदर ३० फूट खोल खड्यात वाहून गेली आहे आणि पावसाच्या वेगवान प्रवाहामुळे लोटून जात आहे. तसेच भूस्खलन  होऊन शेतमजुरांच्या जीवितास धोका  निर्माण होईल अशी अवस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे सदर शेतजमिन कसण्यायोग्य राहलेली नाही ही वस्तुतीथी आहे.उपरोक्य बाबत श्री नरळे यांनी तत्कालिन तलाठी, सर्कल, तहसील कार्यलय सांगोला, पोलिस स्टेशन व मा जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करुन कार्यवाही करणेबाबत पाठपुरावा केलेनंतर तलाठी आणि सर्कल यांनी अंदाजे ३०००० ब्रास माती उचलली असताना जुजबी १५०० ब्रास चा पंचनामा करुन तहसील कार्यलंय सांगोला येथे उथोचित  कार्यवाही साठी जमा केलेला होता. पण वारंवार पाठपुरावा करुणही ठोस वसुली किंवा कार्यवाही झालेली अद्यापपर्यंत झालेली नव्हती.
त्यामुळे श्री नरळे यांनी १५ ऑगस्ट २०२३ ला तहसील कार्यालय सांगोला येथे बेमुदत उपोषणाचा इशारा लेखी स्वरुपात तहसील कार्यालयाकडे दिला होता. सदर आंदोलनाचा विचार होऊन श्री महादेव कृष्णा बाड यांना दंडासहित रक्कम ₹ १८६०५५०.०० ची भरणेबाबत काढणेत अली आहे. परंतु सदर रक्कम वस्तूस्थितीला आणि वास्तवाला धरून नसून ती खूप  खूपच कमी आहे म्हणून श्री अशोक नरळे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणेवर ठाम होते.परंतु सदर आंदोलन १५ ऑगस्ट या संवेनशील दिवशी करू नये व योग्य ती उचित व यथायोग्य कार्यवाही तातडीने करणेत येईल असे  श्री नरळे यांना  मा तहसीलदार यांचेकडुन सांगनेत आले. त्यानुसार श्री नरळे यांचेसोबत एकत्रित स्पॉट सर्व्हे  तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांचेकडुन दि १६ ऑगस्ट रोजी करणेत आला आणि ठोस आणि वस्तुस्थितीला धरून सबळ आणि ठोस कार्यवाही करनेत येईल असे सांगणेत आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!