सांगोला तालुकाशैक्षणिक

प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

सांगोला( प्रतिनिधी) सांगोले नगरीचे माजी नगराध्यक्ष,महाराष्ट्र विरशैव सभा प्रांतिक अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी प्रांतिक सदस्य, आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना प्रांत ३२३४ ड१चे माजी प्रांतपाल, सां.ता.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष व विद्यामंदिर परिवार,लायन्स क्लब,महाराष्ट्र साहित्य परिषद, नगर वाचन मंदिर सांगोला शाखांचे मार्गदर्शक मा.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सदर रक्तदान शिबिर शनिवार दि.२० मे २०२३ रोजी नाझरा येथे ठिकाण नाझरा विद्यामंदिर नाझरा,रविवार २१ मे रोजी कोळा येथे ठिकाण नंदिकेश्वर ज्वेलर्स,शिवकृपा बिल्डिंग तळमजला कोळा, सोमवार २२ मे २०२३ लोणविरे येथे ठिकाण लोणविरे हायस्कूल लोणविरे व मंगळवार २३ मे २०२३ रोजी सांगोला येथे ठिकाण जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा नंबर १, जुने कोर्ट जवळ, सांगोला येथे सकाळी ८.०० ते सायं. ६.०० या वेळेत संपन्न होणार आहे.

तरी सांगोला तालुक्यातील सर्व सेवाभावी संस्था व शैक्षणिक,साहित्यिक,राजकीय, सामाजिक, औद्योगिक, कला, क्रीडा आदि.क्षेत्रातील सर्वांनी रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हा विचार प्रमाण मानून जास्तीत जास्त सांगोला शहर व परिसरातील नागरिकांनी रक्तदान करावे व मानवतेच्या कार्यास हातभार लावावा, असे आवाहन लायन्स क्लब सांगोला व विद्यामंदिर परिवार यांचे वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!