आमदार शहाजीबापू पाटलांनी जाणून घेतल्या तालुक्यातील जनतेच्या अडचणी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे दिले आदेश

आमदार शहाजीबापू पाटलांनी जाणून घेतल्या तालुक्यातील जनतेच्या अडचणी

शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे दिले आदेश

सांगोला (तालुका प्रतिनिधी): गुडघेदुखीच्या आजारातून बरे झाल्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी संपर्क कार्यालयात उपस्थित राहून जनतेच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर संपर्क कार्यालयात उपस्थित राहिल्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी तात्काळ सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सर्व योजनांची सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेत अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस सर्व शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

गुडघेदुखीचा त्रास असतानाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी माढा लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेत पायाला भिंगरी बांधून प्रचार यंत्रणा राबविली. मात्र, या प्रचाराच्या धावपळीत गुडघेदुखीचा आजार बळवल्याने आमदार शहाजीबापू पाटील यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार झाले. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जावून आमदार शहाजीबापूंच्या तब्येतीची विचारपूस केली होती. तसेच अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी रुग्णालयात आमदार शहाजीबापूंची भेट घेवून तब्येतीची विचारपूस केली होती.

आजारातून बरे झाल्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी चिकमहूद गावी आले. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्याने आजारी असतानाही शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील हे महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी विधीमंडळात दाखल झाले. यावरून आमदार शहाजीबापू पाटील यांच्या तब्येतीबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

तब्येत ठणठणीत झाल्याने सोमवार १५ जुलै रोजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी संपर्क कार्यालयात उपस्थित राहून जनतेच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या.

आ.शहाजीबापूंनी जनसंपर्क कार्यालयांमध्ये उपस्थित राहून तालुक्यातील जनतेशी संवाद साधला. तालुक्यातील मुख्य प्रश्न जाणून घेऊन त्या समस्या निराकरण करण्यासाठी प्रशासनाला तातडीने आदेश दिले. यावेळी उपस्थित नागरिकांनी देखील आमदार शहाजी बापूंच्या तब्येतीची विचारपूस करून शरीराची काळजी घेण्याची विनंती केली. यावेळी आमदार शहाजीबापूंनी पीक विमा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, नवमतदार नोंदणी अभियान, दुष्काळ निधीचे वाटप, खरीप हंगामातील पेरण्या, प्रगतीपथावर असलेली विकास कामे , पाणीपुरवठा, जनजीवन मिशन योजनेंतर्गत सुरू असलेली कामे, शासकीय विश्रामगृह व प्रशासकीय भवनचे सुरू असलेले काम, याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेत शासनाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button