विद्यामंदिर प्रशालेच्या शिक्षकांनी स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम केल्यानेच हे यश- सहाय्यक सहकार अधिकारी सुप्रिया धायगुडे- देशमुख

नाझरा(वार्ताहार):- मी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत नाारा विद्यामंदिर प्रशालेत शिकत होते,यावेळी गणित, इंग्रजी,विज्ञान,मराठी,हिंदी, समाजशास्त्र यासारख्या विषयांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी प्रत्येक विषयाचे पायाभूत ज्ञान दिल्यामुळे मी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देऊ शकले.स्पर्धा परीक्षा देण्याचा आत्मविश्वासच या प्रशालेने मला दिला.प्रशालेने स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम केल्यामुळेच हे यश मला मिळाले आहे असे प्रतिपादन सहाय्यक सहकार अधिकारी सुप्रिया धायगुडे-देशमुख यांनी केले.
सहकार आयुक्तालय महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक सहकार अधिकारी गट-ब या पदावरती नुकतीच निवड झालेल्या सुप्रिया विजयसिंह धायगुडे-देशमुख यांचा नाझरा विद्यामंदिर प्रशालेच्या वतीने सहकुटुंब सत्कार घेण्यात आला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास प्राचार्य बिभीषण माने,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,ज्येष्ठ शिक्षक विनायक पाटील, प्रा. महेश विभुते,वसंत गोडसे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.पुढे बोलताना सुप्रिया धायगुडे यांनी प्रशालेतील विविध आठवणींना उजाळा दिला.