फॅबटेक मध्ये इंजिनीअरिंगच्या प्रवेशास सुरुवात*; *अर्ज भरण्याची मोफत सोय : कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे*

सांगोला : फॅबटेक इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया रविवारपासून सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्याची अंतिम मुदत २४ जुलैपर्यंत असून, अंतिम गुणवत्ता यादी २ ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे यांनी दिली.
सीईटी सेल ने इंजिनीअरिंग पदवी प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. इंजिनीअरिंग प्रवेश ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे (कॅप) होणार आहेत. प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक ‘सीईटी सेल’च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी माहितीपुस्तिका वाचून काळजीपूर्वक अर्ज करावेत, असे आवाहन प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे यांनी केले आहे.
महाविद्यालयामध्ये सिव्हील इंजिनिअरिंग, कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, व ए.आय. अँण्ड डेटा सायन्स या शाखा उपलब्ध आहेत . या शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात आता सद्यस्थितीत व भविष्यात मोठ्या संख्येने नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहे . त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मार्गदर्शन केंद्राला भेट द्यावी तसेच अधिक माहितीसाठी ८४०८८८८५०४ / ८४०८८८८६५७ या नंबर शी संपर्क साधण्याचे आवाहन अँडमिशन समन्वय प्रा.राजकुमार गावडे यांनी केले आहे.
वेळापत्रक पुढीलप्रमाणे…
२४ जुलै – अर्ज करण्यासाठी मुदत
१५ ते २५ जुलै – कागदपत्र तपासणी व अर्ज निश्चितीची मुदत
२७ जुलै- प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याची तारीख
२८ ते ३० जुलै – यादीवरील आक्षेपासाठी मुदत
२ ऑगस्ट – प्रवेशासाठी अंतिम गुणवत्ता यादीची तारीख