सांगोला तालुका

प. महाराष्ट्रातील 55 दुष्काळी तालुक्यातील सिंचन प्रकल्पास भरीव पॅकेजची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

सांगोला ( प्रतिनिधी): दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या पत्नी अँड जिजामाला नाईक निंबाळकर, कन्या ताराराजे, इंदिरा राजे, यांनी भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील 55 दुष्काळी तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरीव पॅकेजची मागणी केली.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी दिलेल्या निवेदन व चर्चामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगाना या राज्यांमध्ये सध्या कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत वाद सुरू असून या वादात तेलंगाना राज्य सरकार, सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. हा प्रश्न निकाली निघावा यासाठी केंद्रशासन स्तरावर प्रयत्न करावा. त्यानंतर कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना प्रकल्प मार्गे लावावा यासाठी विशेष योजना तयार करून या 55 दुष्काळी तालुक्यासाठी विशेष पॅकेज देऊन हे सिंचन प्रकल्प मार्गी लावावेत. हे दुष्काळी तालुके परंपरागत दुष्काळी म्हणूनच आजही गणले जातात. त्यामुळे या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून या दुष्काळी जनतेला न्याय द्यावा अशी मागणी केली. तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारने निरा देवधर या प्रकल्पास सुप्रीमा देऊन निधीची तरतूद राज्य शासनाने केली आहे. या प्रकल्पास आता केंद्र शासनाकडून सुद्धा निधीची तरतूद व्हावी व या दुष्काळी पट्ट्यातील हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा अशी ही मागणी केली. तसेच या दुष्काळी पट्ट्यातील धोम बलकवडी हा प्रकल्प राज्य शासनाच्या माध्यमातून आठमाही होणार आहे. तो बारमाही करण्यासाठी काही योजना करता येईल का? याचा ही केंद्रस्तरावर प्रयत्न व्हावेत अशी मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापुर योजनेसाठी निधी दिला असल्यामुळे हा प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा दौरा करून कृष्णा भीमा स्थिरीकरण हा प्रकल्प लवकर मंजूर व्हावा. कृष्णा लवादाच्या निर्णयानुसार एका नदीच्या खोऱ्यातील पाणी दुसऱ्या नदीच्या खोऱ्यात वळवता येत नसल्याने कृष्णा भीमास्तरीकरण योजना पूर्णत्वास आणण्यासाठी असलेल्या अडचणी दूर करून यावर उपलब्ध पाणी वाटपाची फेररचना कृष्णा पाणी तंटा लवाद आयोगाच्या माध्यमातून करण्यात यावी. यासाठी या आयोगाचा अहवाल महत्त्वाचा आहे ही बाब खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिली. या आयोगावर पंतप्रधान मोदींनी लक्ष घालण्याची विनंती केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास महाराष्ट्रातील 55 दुष्काळी तालुके कायमस्वरूपी सिंचनाखाली येणार असून लाखो हेक्टर क्षेत्र बागायत होईल. या तालुक्यातील दुष्काळ संपून या भागातील शेतकरी सधन व शेती संपन्न आर्थिक दृष्ट्या सदन होईल व मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. यावेळी मतदार संघातील उर्वरित प्रश्न मार्गी लावावेत. फलटण पंढरपूर रेल्वे बाबत तरतूद झाली असून हे ही काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी संबंधित विभागास आपण सूचना द्याव्यात अशी ही विनंती खासदार रणजितसिंह यांनी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक यावर विचार होऊन लवकरच हे प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली. या भेटीदरम्यान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भावूक झाले होते. लवकरच माढा मतदारसंघातील उर्वरित प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील अशी आशा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!