उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून विधानसभेत स्व.गणपतराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा
टेंभू विस्तारित योजनेच्या 109 गावाना 15 एप्रिलपर्यंत मान्यता मिळणार
सांगोला(प्रतिनिधी):- टेंभू योजनेसाठी सर्वाधिक निधी आमच्या सरकारच्या काळात दिला गेला.टेंभू विस्तारित योजनेत 109 गावे आहेत.15 एप्रिलपर्यंत याला मान्यता मिळेल असा विश्वास व्यक्त करत स्व. गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर जे स्वप्न पाहिले, ते पूर्ण केल्याबद्दल स्व.गणपतराव देशमुख यांनी त्यावेळी जलसंधारण मंत्री गिरीश महाजन व आमचा सत्कार केला होता अशी आठवण उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या कामकाजाप्रसंगी सभागृहाला करुन दिली.
विशेषता सांगोला तालुक्यातील टेंभू योजनेमुळे नव संजीवनी मिळणार आहे. वंचित गावांना लवकरच कायमस्वरूपी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न यामुळे निकाली निघणार आहे.
सध्या महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे. याच दरम्यान विधानसभेच्या सभागृहामध्ये चर्चेदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना सांगितले की, या योजनेला सर्वाधिक जास्त निधी सन 2015 ते 2019 या कलावधीत दिले हातेे. टेंभू योजना ही मागच्या कालावधीत प्रधानमंत्री योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करुन जवळपास प्रमुख भाग संपविला असून 80 टक्के सिंचन क्षमता वापरात देखील येत आहे. आता ही विस्तारीत योजना असून साधारणपणे 109 गावे आणि 41 हजार हेक्टर भाग येतो आहे.जवळजवळ 2 हजार 400 कोटी रुपये लागणार आहे. मागच्या काळात प्रंधानमंत्री योजनेअंतर्गत विस्तारीत योजनेसाठी पीडीएन पध्दत स्विकारली.पीडीएन पध्दत स्विकारल्यामुळे मुळ पाण्यापेक्षा जास्त पाणी उपलब्ध झाले असल्यामुळे या योजनेमध्ये आता अतिरिक्त गावे समावेश करु लागलो आहे. साधारण एप्रिल महिना अखेर एसएलटीसीची मान्यता घेवून त्यानंतर 1 महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता देवू असे सांगत त्यानंतर टेंडरची कारवाई करु अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली.