सांगोला तालुका

विठुरायाच्या पावनभूमीत उमललेल्या एल के पी मल्टीस्टेटचा वेलू गगनावरी जाईल — ह भ प रसाळ महाराज

लोकार्पण सोहळ्यासाठी अभिजीतआबा पाटील , कल्याणराव काळे यांचेसह मान्यवरांची मांदियाळी 
प्रतिनिधी —  जेव्हा नव्हते चराचर,  तेव्हा होते पंढरपूर…. अठ्ठावीस युगांपासून विटेवरी उभा ठाकून भक्तांच्या पाठीशी असलेल्या विठुरायांच्या या पवित्र पुण्यभूमी मध्ये लक्ष्मीच्या पावलांनी दाखल झालेली एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी ही संस्था आज उमललेली आहे. या संस्थेचे चेअरमन तसेच सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले व त्यांचे मित्र सहसंस्थापक डॉ. बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत गुरुजी व सुभाष दिघे गुरुजी  हे चारही युवक संत महंतांनी घालून दिलेल्या  परंपरेनुसार आपली वाटचाल करत आहेत.  जोडूनिया धन उत्तम व्यवहारे , उदास विचारे वेच करी…. या संत वचनाप्रमाणे अत्यंत पारदर्शी राहून व जनहिताचे व्यवहार करत गेली अनेक वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये वावरतात. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची प्रवृत्ती आणि अपार कष्ट करण्याची तयारी यामुळेच सूर्योदय उद्योग समूहाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय असो, कपड्यांचा व्यवसाय असो किंवा इतर काही व्यवसायांबरोबरच अर्थ क्षेत्रामध्ये त्यांनी केलेली क्रांती अचंबित करणारी आहे. आम्ही संस्थेचे मालक नसून लक्ष्मीच्या या पालखीचे भोई आहोत ही भावना मनात ठेवत विश्वस्तांच्या भूमिकेत राहून वाटचाल करत असल्यामुळेच त्यांच्या संस्थेचा व्यवसाय शंभर कोटींच्या पुढे गेला असून पंढरपुरातील या एलकेपी मल्टीस्टेटचा वेलू निश्चितच गगनावरी जाईल असे मौलिक मार्गदर्शन संत साहित्याचे अभ्यासक ह भ प तुळशीदास रसाळ महाराज यांनी केले.  एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या पंढरपूर  येथील शाखेच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त उद्घाटक म्हणून ते बोलत होते . यावेळी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख अभिजीतआबा पाटील, चंद्रभागा साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनीही उपस्थित राहून संस्थेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सुरुवातीलाच संस्थेचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी प्रस्ताविकामध्ये संस्थेबद्दल व सूर्योदय उद्योग समूहाबद्दलची विविध प्रकारची माहिती सांगितली. सोलापूर जिल्हा व परिसरामध्ये सूर्योदय उद्योग समूहाच्या माध्यमातून जगन्नाथ भगत गुरुजी ,डॉ. बंडोपंत लवटे व सुभाष दिघे गुरुजी असे आम्ही दोघेजण गेली सुमारे 13 वर्षांपासून विविध प्रकारच्या उद्योग व्यवसायांमध्ये कार्यरत असून कापड व्यवसाय , फर्निचर व्यवसाय, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स, सूर्योदय मोटर्स अशा व्यवसायांबरोबरच आमचे पार्टनर डॉ. लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन तालुक्यांमध्ये पाच चीलिंग प्लांट च्या माध्यमातून एक लाखाहून अधिक दैनंदिन दूध संकलन देखील सध्या सुरू आहे.  या एलकेपी मल्टीस्टेटच्या वतीने ठेवीदारांसाठी अनेक प्रकारच्या योजना  सुरू करण्यात आलेल्या असून एलकेपी कन्यादान ठेव योजना, एलकेपी पेन्शन योजना यासह अवघ्या शंभर दिवसांच्या ठेवीवर देखील ही संस्था दहा टक्के इतका व्याजदर देते.  13 महिन्यांसाठी १२ टक्के व्याजदर असून 24 महिन्यांच्या पुढे साडेबारा टक्के ठेवीवर व्याजदर आहे . तसेच संत महंत, विधवा भगिनी ,माजी सैनिक , ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्याकरिता अर्धा टक्के जादा व्याजदर असून अशा ग्राहकांसाठी 13% इतका व्याजदर ठेवीवर देण्यात येतो.  संस्थेच्या वतीने कर्जाच्या देखील अनेक प्रकारक्या योजना असून छोटे-मोठे व्यवसायिक व व्यापारी बांधवांसाठी ही संस्था वरदान ठरत असल्याचीही माहिती यावेळी इंगवले यांनी दिली. एनईएफटी,आरटीजीएस, आय एम पी एस अशा प्रकारच्या अनेक सुविधा या संस्थेच्या वतीने मोफत देण्यात येत असून ज्या ज्या ठिकाणी आपल्या संस्थेची शाखा आहे ,त्या त्या ठिकाणी व्यापारी व उद्योजक यांनी संस्थेवरती मोठ्या प्रमाणावर सहकार्य व प्रेम केलेले आहे.  या मल्टीस्टेटच्या एकूण 43 शाखांना शासनमान्यता असून महाराष्ट्र व कर्नाटक असे दोन राज्य या संस्थेचे कार्यक्षेत्र निश्चित केलेले आहे. आपली ही संस्था आजपासून पंढरपूरकरांच्या सेवेमध्ये रुजू झाली असून  आपल्या सर्वांचा सहभाग या संस्थेच्या वाटचाली करता खूप महत्त्वाचा असल्याच्या भावना देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवल्या.  या कार्यक्रमासाठी दीपकदादा वाडदेकर, नगरसेवक किरणराज घाडगे, उद्योगपती दत्ता बागल, भीमराव बागल, दीपकदादा पवार, धनंजय काळे, शिक्षकांचे राज्यस्तरीय नेते बाळासाहेब काळे, किरण कुंभार,  कैलास सपकाळ साहेब, उत्तमराव जमदाडे , प्रशांत वाघमारे , सुनील कोरे,  मुलानी सर , तात्या कोळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच व्यावसायिक ,व्यापारी, उद्योजक व ग्राहक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!