सांगोला तालुका

आपुलकी प्रतिष्ठान, अजिंक्य हॉस्पिटल, टायटन आय प्लस यांच्यावतीने ५७ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

सांगोला (प्रतिनिधी )- आपुलकी प्रतिष्ठान, अजिंक्य हॉस्पिटल, टायटन वर्ल्ड व टायटन आय प्लस व सांगोला एस. टी. डेपो यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सांगोला आगारातील ५७ कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
आगारातील चालक, वाहक, कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने हे शिबीर घेण्यात आले. या शिबिरात एकूण ५७  जणांची तपासणी करण्यात आली. अजिंक्य हॉस्पिटलचे डॉ. अजिंक्य गिरीश नष्टे यांनी सर्वांची इसीजी टेस्ट, रक्त ( शुगर ), रक्तदाब तपासणी केली. त्यांना स्वप्नील लोंढे, बालाजी ढोले, कल्पना सुरवसे यांनी सहकार्य केले. त्याचबरोबर टायटन वर्ल्ड व टायटन आय प्लसचे श्रीकांत कांबळे यांच्याकडील अभयसिंह चव्हाण, राहुल पदमाळे, महेश बाबर, यांनी सर्वांची नेत्र तपासणी केली.
  या शिबिराला आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, डॉ. मच्छिन्द्र सोनलकर, रमेशअण्णा देशपांडे, महादेव दिवटे, अरविंद डोंबे, सुभाष लऊळकर,  प्रमोदकाका दौंडे, निलेश नष्टे, संदीप पाटणे, दादा खडतरे, श्रीकांत देशपांडे, रमाकांत स्वामी आदीसह आगार व्यवस्थापक विकास पोफळे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सागर कदम, वरिष्ठ लिपिक प्रताप टकले, संतोष महारनवर आदीसह आगारातील चालक, वाहक कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!